पुसद (Pusad) :- शहरात वाढलेल्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना आळा बसावा व शहरातील गुन्हेगारी कमी व्हावी या करीता ठाणेदार उमेश बसरकर यांनी प्रभावी गस्त (Patrolling) वाढवुन कारवाई करण्याचे आदेश पोलीस स्टेशनच्या डी. बी. पथकास सुचना दिल्या त्याच सुचणे प्रमाणे पुसद शहर डी.बी. पथक शहरात पेट्रोलींग करीत असताना डी.बी. पथकास गोपनिय बातमीदार यांच्या कडुन खात्रीलायक माहिती मिळाली की, एक व्यक्ती हातात धारदार शस्त्र घेउन दहशत निर्माण करीत असुन घातपात करण्याच्या उद्देशाने संशईतरीत्या पुसद शहरातील मांगीलालदादा कमानीजवळ ईटावा वार्ड पुसद येथे फिरत आहे.
व्यक्ती हातात धारदार शस्त्र घेउन दहशत निर्माण करीत असुन घातपात करण्याच्या उद्देशाने संशईतरीत्या फिरत आहे
माहितीवरून घटनेचे गांभीर्य ओळखुन डी.बी.प्रमुख सपोनि निलेश देशमुख व डी.बी. स्टॉप. पथक यांनी अतिशय कौशल्यपुर्वक सापळा रचुन पोलीस रीकॉर्डवर असलेला आरोपी आकाश विलास बोधने वय 29 वर्ष रा. आंबेडकरवार्ड पुसद यास ताब्यात घेतले असता त्यांचे जवळ पांढ-या शेल्यामध्ये गुंडाळुन एक धारदार व टोक असलेली तलवार (sword) किंमत 700/ रुपयाची मिळुन आली. त्यास शस्त्रासह अटक करून त्याच्यावर पोलीस स्टेशन (Police station) पुसद शहर येथे कलम 4,25 शस्त्र अधिनियम 1959 प्रमाणे गुन्हा नोंद करुण पुढील तपास स.पो.नि.निलेश देशमुख डी. बी. स्टॉप करीत आहेत.