पातुर (Hail damage subsidy) : पातुर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी आज नायब तहसीलदार श्रीकांत घुगे यांना आज 25 ऑक्टोबर 2024 रोजी एक लेखी निवेदन देऊन रब्बी पिकांच्या गारपीट नुकसानीसाठी तात्काळ अनुदान देण्याची मागणी केली आहे. २०२३-२४ च्या हंगामात झालेल्या (Hail damage subsidy) गारपीटमुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान झाले आहे, विशेषतः कांदा, गहू, आणि लिंबू या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
शेतकऱ्यांनी निवेदनात स्पष्ट केले आहे की, (Hail damage subsidy) गारपिटीनंतर तहसील कार्यालयाकडून पंचनामे करण्यात आले असले तरी अद्याप अनुदानाची रक्कम मिळालेली नाही. या पार्श्वभूमीवर, दिवाळीच्या दिवसात त्यांच्या आर्थिक परिस्थितीवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, तात्काळ अनुदान न मिळाल्यास, दिवाळीच्या दिवशी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
निवेदनाची मुख्य मुद्दे
१. गारपिटीनंतर शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती अत्यंत गंभीर आहे.
२. याबाबत सर्व कागदपत्रांची पूर्तता केली आहे, तरीही अनुदान अद्याप प्राप्त झालेले नाही.
३. गारपीटामुळे शेतकऱ्यांचे रब्बी पीक मोठ्या प्रमाणात प्रभावित झाले आहे.
४. निवेदनाद्वारे अनुदानाची तात्काळ वितरणाची मागणी.
समाविष्ट शेतकऱ्यांची यादी
या निवेदन देणाऱ्या मध्ये एडवोकेट सुरज झडपे, पंचायत समिती सदस्य, पंजाबराव महानकर,संदीप तांदळे, भगवान नावकर, हिम्मतराव रोकडे, अजय ढाकरे, धनंजय बदरके, श्रीकृष्ण तेलारकर, अतीक बेग, शेखचाद, अब्दुल गणी राजेंद्र देशमुख, नागेश गावंडे, हरिदास परकाळे, अरुण फाटकर, अब्दुल खाजा, अब्दुल सईद अब्दुल रसिद तसेच इतर शेतकऱ्यांचा समावेश आहे.
या निवेदनाद्वारे शेतकऱ्यांनी त्यांच्या हक्कांसाठी लढण्याचा ठराव केला असून, यामध्ये त्यांच्या एकजुटीचा स्पष्ट संदेश आहे. (Hail damage subsidy) गारपिटामुळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी तात्काळ अनुदान देण्याची आवश्यकता आहे, अन्यथा त्यांचे आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी केलेल्या या प्रयत्नांचे सर्व स्तरांतून स्वागत केले जात आहे, आणि प्रशासनाकडून लवकरच योग्य उपाययोजना अपेक्षित आहेत.