मुंबई (Mumbai) :- PhonePe आणि HDFC बँकेने आज ‘फोनपे HDFC बँक को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड’च्या लाँचची घोषणा केली. या निमित्ताने फोनपेने को-ब्रँडेड कार्ड क्षेत्रात प्रवेश केला आहे. भारतीय ग्राहकांच्या बदलत्या आर्थिक गरजा लक्षात घेऊन HDFC बँकच्या भागीदारीने सादर करण्यात आलेली RuPay को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड्सची ही नवी श्रेणी तयार करण्यात आली आहे. विशेषत: फोनपे प्लॅटफॉर्मवरून करण्यात आलेल्या UPI पेमेंट्सवर लाभ उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
‘फोनपे HDFC बँक को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड’च्या लाँचची घोषणा
क्रेडिट कार्ड्स अधिक सुलभपणे उपलब्ध आणि युजर-फ्रेंडली व्हावी यासाठी HDFC बँक आणि फोनपे यांच्यातील धोरणात्मक भागीदारीमध्ये त्यांच्या अनुक्रमे बँकिंग आणि फिनटेक क्षेत्रातील बलस्थानांचा उपयोग करण्यात आला आहे. ‘अल्टिमो’ आणि ‘युनो’ या व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध असलेल्या या कार्ड्सवर रिचार्ज, बिल पेमेंट, प्रवास, ऑनलाईन खरेदी, किराणा सामान आणि कॅब बुकिंग यांसारख्या अधिक प्रमाणात होणाऱ्या खर्चांवर आकर्षक रिवॉर्ड्स मिळतात. या कार्ड्समध्ये UPI सोबत इंटिग्रेशन करण्यात आले असून, वापरकर्ते रोजच्या खरेदीसाठी क्रेडिट कार्डचा वापर करून UPI QR द्वारे पेमेंट करू शकतात आणि त्यावर रिवॉर्ड्सही मिळवू शकतात.
या लाँचविषयी फोनपेच्या कन्झ्युमर पेमेंट्स विभागाच्या चीफ बिझनेस ऑफिसर श्रीमती सोनिका चंद्रा म्हणाल्या, “”HDFC बँकेच्या भागीदारीने आमचे पहिले को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड सादर करत असल्याचा आम्हाला आनंद आहे.
निवडक खर्चांवर 10% रिवॉर्ड पॉइंट्स देत असल्यामुळे फोनपेच्या ग्राहकांना त्यांच्या दैनंदिन व्यवहारांवरही फायदे
ही भागीदारी म्हणजे आमच्या व्यापक युजर बेससाठी नावीन्यपूर्ण आर्थिक सेवा देण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे. हे कार्ड बिल पेमेंट्स, रिचार्जेस आणि ट्रॅव्हल बुकिंग्ज यांसारख्या निवडक खर्चांवर 10% रिवॉर्ड पॉइंट्स देत असल्यामुळे फोनपेच्या ग्राहकांना त्यांच्या दैनंदिन व्यवहारांवरही फायदे मिळतील. या शिवाय UPIच्या माध्यमातून पेमेंट स्वीकारणाऱ्या लाखो व्यापाऱ्यांकडे हे कार्ड सहज वापरता येते. HDFC बँकेशी झालेली ही धोरणात्मक भागीदारी आणि या कार्डमधील फायद्यांच्या जोरावर कोट्यवधी भारतीयांसाठी क्रेडिट कार्ड वापरण्याच्या अनुभवात अमूलाग्र बदल होईल, असा आम्हाला विश्वास आहे. HDFC बँकेच्या पेमेंट्स, लायेबिलिटी प्रॉडक्ट्स, कन्झ्युमर फायनान्स आणि मार्केटिंग, श्री. पराग राव म्हणाले, “भारतातील कार्ड जारी करणारा आघाडीची कंपनी म्हणून, ग्राहकांसाठी प्रभावी आणि त्यांच्यासाठी उपयुक्त असलेल्या सेवा सादर करण्याचा आणि क्रेडिट सुविधा अर्थपूर्ण पद्धतीने अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. फोनपेसोबतच्या भागीदारीमुळे आम्हाला डिजिटल व्यवहारांशी सख्य असलेल्या ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची संधी प्राप्त झाली आहे.
UPIसारख्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून क्रेडिट कार्ड्स अधिक फायदेशीर ठरतील आणि सहज वापरता येतील. कारण UPI हे आज भारताच्या डिजिटल पेमेंट्स इकोसिस्टीममध्ये केंद्रस्थानी आले आहे. या को-ब्रँडेड कार्डच्या माध्यमातून ग्राहकांना HDFC बँकेच्या विश्वासार्ह क्रेडिट कार्ड प्लॅटफॉर्मचा आणि फोनपेच्या ग्राहककेंद्री डिजिटल अनुभवाचा दुहेरी लाभ मिळतो.”
‘अल्टिमो’ व्हेरिएंटद्वारे ग्राहकांना भरघोस रिवॉर्ड पॉइंट्स मिळतात. त्यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश आहे :
फोनपे अॅपवर बिल पेमेंट्स, रिचार्जेस, ट्रॅव्हल बुकिंग्ज आणि फोनपेच्या ‘पिनकोड’ या हायपरलोकल ॲपवरील खरेदी यांसारख्या श्रेणींमध्ये 10% रिवॉर्ड पॉइंट.
नामांकित ऑनलाईन मर्चंट्सकडे होणाऱ्या खर्चावर 5% रिवॉर्ड पॉइंट.
कार्ड वापरून ‘UPI स्कॅन अॅण्ड पे’ व्यवहारांवर 1 % रिवॉर्ड पॉइंट.
प्रत्येक तिमाहीत दोन स्थानिक विमानतळांवर लाउंज अॅक्सेस
योग्य पात्रता असलेले फोनपे वापरकर्ते फोनपे मोबाईल अॅपवरून या को-ब्रँडेड क्रेडिट कार्डसाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल आहे. HDFC बँकेकडून जारी एकदा कार्ड झाले की, युजर ते फोनपेवरून लिंक करू शकतात आणि UPI द्वारे व्यापाऱ्यांना पेमेंट करू शकतात. तसेच, वापरकर्ते फोनपे अॅपवरूनच हे कार्ड मॅनेज करू शकतात आणि आपल्या क्रेडिट कार्डचे मासिक बिलही भरू शकतात.
हे कार्ड पात्र फोनपे युजरसाठी टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून देण्यात येईल.