नवी दिल्ली (New Delhi):- फोनपेने कोलंबो येथे झालेल्या एका भव्य कार्यक्रमात लंकापेसह(Lankapay) लंकाQR व्यापारी पॉइंट्सवर UPI पेमेंट्सला प्रोत्साहन देत असल्याचे जाहीर केले आहे. या कार्यक्रमाला श्रीलंकेतील(sri lanka) भारताचे उच्चायुक्त संतोष झा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, त्यांनी भारत आणि श्रीलंका यांच्यातील एकूण कनेक्टिव्हिटीमध्ये फिनटेक कनेक्टिव्हिटीने बजावलेल्या महत्त्वाच्या भूमिकेवर प्रकाश टाकला. या कार्यक्रमासंबंधी बोलताना, सेंट्रल बँक ऑफ श्रीलंका (CBSL)चे गव्हर्नर डॉ. नंदलाल वीरासिंघे यांनी, नवीन संधी अनलॉक करण्याची आणि स्पर्धात्मकता वाढवण्याची आणि श्रीलंकेच्या व्यापाऱ्यांना होणारे फायदे यामधील सहकार्याच्या क्षमतेला दुजोरा दिला.
फोनपे आणि लंकापे यांच्यातर्फे श्रीलंका आणि भारत सरकारमधील
लंकापेच्या सीईओ (ceo) चन्ना डीसिल्वा यांनीही श्रोत्यांशी संवाद साधला आणि ‘श्रीलंकेतील डिजिटल पेमेंट्सचे भविष्य: श्रीलंकन व्यवसायांसाठी संधी’ या विषयावरील अभ्यासपूर्ण पॅनेल चर्चेचे संचालन केले, यामुळे स्थानिक व्यवसायांच्या शक्यता आणि विकास मार्गांवर लक्ष केंद्रित केले. श्रीमती शशी कंदांबी, जीएम/सीईओ, नॅशनल सेव्हिंग बँक(National Savings Bank); श्री. संजय विजेमाने, सीओओ, हॅटन नॅशनल बँक पीएलसी; श्री कॉनरॅड डायस, अध्यक्ष, LOLC वित्त PLC; आणि सुश्री रेणुका फर्नांडो, अध्यक्ष, डायलॉग फायनान्स पीएलसी आदी या सत्राचे वैशिष्ट्य होते, यांनी व्यवसाय डिजिटल पेमेंट तंत्रज्ञानाचा फायदा कसा घेऊ शकतो आणि विकसित होत असलेल्या आर्थिक परिदृश्यात स्पर्धात्मक राहण्यासाठी व्यापक बाजारपेठेत कसे प्रवेश करू शकतो यावर चर्चा केली.
वरिष्ठ मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन
पॅनेल चर्चेनंतर, फोनपेमधील आंतरराष्ट्रीय पेमेंट्सचे सीईओ रितेश पै यांनी जागतिक बाजारपेठेसाठी UPI आणि व्यापाऱ्यांसाठी ते ऑफर करत असलेल्या वाढीच्या शक्यतांबद्दल सखोल माहिती दिली. या कार्यक्रमात बँकिंग क्षेत्रातील वरिष्ठ प्रतिनिधी, पेमेंट सिस्टम प्रदाते आणि पर्यटन क्षेत्र आणि व्यावसायिक संघटनांच्या प्रतिनिधींसह श्रीलंकेच्या आर्थिक क्षेत्रातील अनेक महत्त्वाच्या भागधारकांची उपस्थिती होती. NPCI इंटरनॅशनल पेमेंट्स लिमिटेड (NIPL) सह लंकापेच्या भागीदारीद्वारे ही हे एकत्रीकरण सुलभ झाले आहे. कार्यक्रमादरम्यान फोनपेने घोषणा केली, की श्रीलंकेला प्रवास करणारे त्यांचे ॲप युजर आता देशभरातील लंकापेQR व्यापाऱ्यांकडे UPI वापरून पेमेंट करू शकतात. रोख रक्कम बाळगायला नको की चलनाची मोजदाद ठेवायला नको, युजर आता केवळ लंकाQR कोड स्कॅन करू शकतात. चलन विनिमय दर दाखवून त्यांच्या खात्यातून भारतीय रुपयांमधून डेबिट केले जाईल. हे व्यवहार युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) आणि लंकापे नॅशनल पेमेंट नेटवर्कद्वारे सोपे करून दिले जातात.
सीमापार पेमेंटमध्ये क्रांती घडवून आणण्यासाठी फोनपेसह संलग्नित होताना लंकापेला आनंद
लंकापेचे सीईओ चन्ना डीसिल्वा पुढे म्हणाले, “श्रीलंका आणि भारत यांच्यातील सीमापार पेमेंटमध्ये क्रांती घडवून आणण्यासाठी फोनपेसह संलग्नित होताना लंकापेला आनंद होत आहे. ही भागीदारी फोनपे ॲपद्वारे श्रीलंकेतील सर्व लंकाQR व्यापारी पॉइंट्सवर सतत UPI पेमेंट करण्यासाठी भारतीय पर्यटक आणि व्यावसायिक प्रवाशांना उत्तम सुविधा देईल. आम्ही या संलग्नितेच्या संभाव्यतेबद्दल उत्सुक आहोत ज्यामुळे भारतीय पर्यटक आणि व्यावसायिक प्रवाशांना त्यांच्या श्रीलंकेतील वास्तव्यादरम्यान पेमेंटचा उत्तम आनंद मिळणार आबे आणि व्यापाऱ्यांना कार्ड पेमेंटसाठी किफायतशीर प्रस्तावही मिळेल. नावीन्य हा या युतीचा आधारस्तंभ असेल आणि त्यामुळे दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध अधिक दृढ होतील असेही मला वाटते.”