दोन गुंठे जमिनीच्या फेरसाठी मागितले ८० हजार रुपये
परभणी (Phulkalas Sajja talathi) : पत्नीच्या नावे असलेल्या जमिनीच्या फेरफार कामासाठी प्रति गुंठा चाळीस हजार प्रमाणे ऐंशी हजार रुपये लाचेची मागणी करुन त्यापैकी ४० हजार रुपयांची रक्कम स्विकारताना (Phulkalas Sajja talathi) फुलकळस सज्जाच्या तलाठ्याला परभणी लाचलूचपत विभागाने गुरुवार १ ऑगस्ट रोजी रंगेहाथ पकडले. सदर तलाठ्यावर (Tadaklas police) ताडकळस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
दत्ता संतराम होणमाने तलाठी सज्जा फुलकळस असे लाचखोर तलाठ्याचे (Talathi office) नाव आहे. या बाबत तक्रारदाराने परभणी लाचलूचपत विभागाकडे तक्रार दिली होती. त्यांच्या पत्नीच्या नावे फुलकळस शिवारात दोन गुंठे जमीन आहे. बँकेच्या कामासाठी जमिनीचा फेरफार करुन सातबारावर नोंद घेणे आवश्यक आहे. यासाठी ५ जुलै रोजी तक्रारदाराने तलाठी दत्ता होणमने यांची भेट घेत कागदपत्र दिले. पुन्हा २२ जुलैला तक्रारदार तलाठ्याला भेटले असता त्यांनी प्रति गुंठा चाळीस हजार प्रमाणे ऐंशी हजारांची मागणी केली. या बाबत तक्रारदाराने लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली.
त्यानुसार १ ऑगस्ट रोजी सापळा लावण्यात आला. (Talathi office) तलाठी दत्ता होणमने यांनी तक्रारदार यांच्या कडून चाळीस हजारांची लाच स्विकारली. त्यांना रक्कमेसह ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई पोलीस उप अधीक्षक अशोक इप्पर, पोनि. बसवेश्वर जक्कीकोरे आणि पथकाने केली.