परभणी/पाथरी (Babajani Durrani) : आपण अनेक मंदिरासाठी सभागृह व सभामंडप उभारले आहेत तर आता पर्यटन विकास योजनेंतर्गत एक कोटी रुपये आणले असून भविष्यात ही तालुक्यातील (Pilgrimage Development) तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन माजी आमदार बाबाजानी दुर्राणी (Babajani Durrani) यांनी केले. तालुक्यातील रामपुरी येथे पर्यटन विकास योजनेंतर्गत एक कोटी रुपयांच्या सभामंडपाचे भूमिपूजन माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांचे हस्ते सोमवार ५ ऑगस्ट रोजी झाले. यावेळी ते बोलत होते.
यावेळी माजी जि. प. सभापती सुभाष कोल्हे, बाजार समिती सभापती अनिल नखाते, जिल्हा बँकेचे संचालक दत्तराव मायंदळे, तालुकाध्यक्ष एकनाथ शिंदे, सरपंच संगीता भदरगे, उपसरपंच अर्चना मुळी, तारेख खान दुर्राणी, विजय पाटील सिताफळे, नारायण आढाव, श्याम धर्मे, संदीप टेंगसे, कल्याण चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलतांना दुर्राणी (Babajani Durrani) म्हणाले कि, माझ्या आमदारकीच्या जास्तीत जास्त निधीचा उपयोग मंदिरासाठी झाला आहे आणि आज त्या सभामंडप , सभागृहात धर्मीक कार्यक्रम होत आहेत. यापुढेही आपण रामपुरी च्या विकासासाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही देत तालुक्यातील (Pilgrimage Development) तीर्थक्षेत्र विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले , यावेळी हभप बाळू महाराज गिरगावकर यांचे कीर्तन व त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम झाला या कार्यक्रमास ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.