दिंडीसोबत पायी गेलेला श्वान पंढरपुरहुन एकटाच गावात दाखल
यमगर्णी (Pandharpur yatra) : येथुन आषाढी वारीसाठी पंढरपूरला ज्ञानदेव कूंभार हे पायी गेले होते. त्यांच्या मागे लागून त्यांचा पाळीव श्वान सुद्धा गेला होता. तो रोज दिंडीसोबत चालत राहिला. असे तो 18 जुलै पर्यंत दिंडी सोबत राहिला. व्दादशीला पंढरपुरहुन दिंडीतले वारकरी यमगर्णीकडे परतणार असल्याने सर्व वारकरी परतीच्या तयारीस लागले. परतीचा प्रवास वाहनातुन होता. त्यामूळे कुत्र्यासही वाहनात घेण्याचा सर्वांचा विचार होता. पण (Pandharpur yatra) पंढरपुरात यात्रेच्या गर्दित तो चुकला. सर्व वारकर्यांनी शोधूनही तो कुत्रा सापडला नाही.
मालकासह सर्व वारकर्यांना वाटले की तो पंढपुरमधेच राहीला. पण काल तो १९० कि.मी. पायी प्रवास करत पंढरपुरहुन (Pandharpur yatra) यमगर्णी गावात दाखल झाला. गावात आल्यावर सर्वानी आश्चर्य व्यक्त केले. यावेळी त्याची विठ्ठल मंदिरापासुन ते ज्ञानदेव कुंभार यांच्या घरापर्यंत मिरवणुक काढुन स्वागत केले.