पुसद (Pusad municipality) : पुसद नगरपालिकेच्या (municipality) पाणीपुरवठा विभागाची (Water Supply) नागरिकांना पाणीपुरवठा वितरण करणारी जलवाहिनी तुफान हॉटेल जवळील सुरू असलेल्या ड्रेनेज नालीच्या खोदकामामुळे जलवाहिनी जेसीबीचा रट्टा बसल्यामुळे फुटली होती. सकाळी पाणीपुरवठा विभागामार्फत या जलवाहिनी मधून पाणी सोडले असता, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाण्याचे फवारे उडून लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली होती. तर परिसरात टोंगळभर पाणी साचले होते.
अनेक दिवसांपासून वारंवार पाईपलाईन फुटण्याचे प्रकार
याची गंभीर दखल घेत (Daily Deshonnati) दैनिक देशोन्नतीने 21 मे च्या अंकात वृत्त प्रकाशित केले. यासंदर्भात नगरपालिकेने पाईपलाईनची दुरुस्ती केली. मुख्याधिकारी तथा प्रशासक अभिजीत वायकोस यांच्या मार्गदर्शनाखाली पाणीपुरवठा विभागाचे विभाग प्रमुख अभियंता माधव पाटील, सलाउद्दीन, इत्यादींच्या सहकार्याने रात्री बारा एक वाजेपर्यंत सदरील जलवाहिनी दुरुस्त करण्याचे काम सुरू होते. साहित्य इथे मिळत नसल्यामुळे बोलावून घेण्यात आले होते. ईगल कंट्रक्शन कंपनीकडून गेल्या अनेक दिवसांपासून वारंवार पाईपलाईन फुटण्याचे प्रकार घडत आहे. (Pusad municipality) नगरपालिकेने ऑगस्ट महिन्यात संबंधितांना नोटीसा बजावल्या होत्या. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागासह संबंधित कंत्राटदार कंपनी त्यांचे विभागीय मॅनेजर तथा सुपरवायझर या सर्वांनी या नोटिसीला केराची टोपली दाखवली, हे विशेष.