लँडिंग करतांना सीमेवर आदळल्यामुळे मोठा स्फोट
मुआन (South Korea Plane crash) : दक्षिण कोरियात एक मोठी दुर्घटना घडली आहे. दक्षिण कोरियात 181 प्रवाशांना घेऊन जाणारे विमान कोसळले आहे. या अपघातात आतापर्यंत 124 जणांचा मृत्यू झाला आहे. (South Korea Plane crash) लँडिंग करताना विमान धावपट्टीवर कोसळले, त्यामुळे हा अपघात झाला.
दक्षिण कोरियातील मुआन आंतरराष्ट्रीय विमानतळावर हा अपघात झाला. हे विमान जेजू एअरवेजचे होते. विमानात 175 प्रवासी आणि सहा फ्लाइट अटेंडंट होते. हे विमान थायलंडहून परतत होते. अहवालानुसार, दोन लोक वगळता सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती आहे. 2 जणांना जिवंत वाचवण्यात यश आले आहे. याशिवाय अन्य 94 प्रवाशांना जीव गमवावा लागण्याची शक्यता आहे. (South Korea Plane crash) विमानतळावरील अग्निशमन अधिकाऱ्यांच्या हवाल्याने सांगितले की, आतापर्यंत 33 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, मात्र ही संख्या अंतिम नाही. आतापर्यंत 179 जणांचा मृत्यू झाला आहे.
South Korea | An aircraft drove off the runway and crashed at Muan International Airport in South Korea, with 23 casualties confirmed, Reuters reported quoting the Yonhap news agency reported on Sunday.
— ANI (@ANI) December 29, 2024
दक्षिण कोरियात विमान कसे कोसळले?
माहितीनुसार, आज रविवारी सकाळी जेजू एअरचे विमान 181 जणांना घेऊन मुआन आंतरराष्ट्रीय विमानतळावर कोसळले. (South Korea Plane crash) लँडिंग दरम्यान चाके उघडू शकली नाहीत, ज्यामुळे विमान विमानतळाच्या सीमेवर आदळले आणि स्फोट होऊन आग लागली.
बँकॉकहून उड्डाण घेतलेले हे विमान स्थानिक वेळेनुसार सकाळी 9 वाजता नैऋत्य किनारी (South Korea Plane crash) विमानतळावर उतरण्याच्या प्रयत्नात धावपट्टीवरून घसरले आणि विमानतळाच्या सीमेवर आदळले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. सोशल मीडियावर शेअर केलेल्या छायाचित्रे आणि व्हिडिओंमध्ये विमानाला आग लागल्याने धूर आणि ज्वाला विमानाच्या काही भागांमध्ये पसरत असल्याचे दिसून आले आहे.