मानोरा(Washim):- राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress) शरदचंद्र पवार गटाच्या कारंजा मानोरा मतदार संघातील उत्सुक उमेदवार आणि पदाधिकाऱ्यांची सभा मतदार संघातील कारंजा येथील विश्राम गृह येथे दि. २१ सप्टेंबर रोजी उत्साहात पार पडली. या सभेत आगामी संवाद यात्रेच्या आयोजनावर चर्चा करण्यात आली. मतदार संघातील ढंगारखेड ते शेंदुरजना आढाव असे कारंजा मानोरा दोन तालुक्यामधून ही संवाद यात्रा जाणार आहे.
ढंगारखेड ते शेंदुरजना आढाव असे कारंजा मानोरा दोन तालुक्यामधून ही संवाद यात्रा
ज्यामध्ये मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार आणि पक्षाचे दोन्ही तालुका कार्यकारिणीचे, सर्व सेलचे पदाधिकारी सक्रिय सहभाग नोंदविणार आहेत. संवाद यात्रेदरम्यान शेतकरी (Farmer)कामगार आणि मतदार संघातील नागरिकांसोबत थेट संवाद साधला जाणार आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी कामगारांचे प्रश्न, मतदार संघातील विकासकामे तसेच शेतकऱ्यांच्या गरजा यावर या यात्रेदरम्यान चर्चा केली जाणार आहे. विशेषतः बिज प्रक्रिया केंद्र, एमआयडीसी आणि बेरोजगारांसाठी शेती आधारित उद्योगाची स्थापना या मुद्यांवर भर दिला जाईल. पांधन रस्ते,कामरगावला तालुक्याचा दर्जा मिळावा ,यासारख्या मागण्याही मांडण्यात येणार आहे. या सभेला माजी आ. अनंतकुमार पाटील, माजी जि.प.सदस्य अरविंद इंगोले, रा.कॉ शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस डॉ.श्याम जाधव(नाईक), ज्योतीताई गणेशपुरे, डॉ.पंकज काटोले, राजुभाऊ अवताडे, डॉ.रमेश चंदनशिव, मनोज पाटील कानकीरड, दिलीप पाटील रोकडे, इम्रान फकिरावले, विनय देशमुख, रउफ मामू, विक्रम डोंगरे, लिकेश बांडे, रमेश जाधव, असलम मामदानी, भोजराज चव्हाण, मुकुंद आडे आदी मान्यवर उपस्थित होते.