सोयाबीनचे क्षेत्र एकवीस हजार हेक्टरने झाले कमी
परभणी (parbhani) :- जिल्ह्यात कृषी विभागाने (Department of Agriculture) खरीप हंगामाची तयारी पूर्ण केली आहे. यंदा जिल्ह्यात पाच लाख ६३ हजार हेक्टरवर खरीप क्षेत्र प्रस्तावित असल्याचे कृषी विभागाने सांगितले आहे.यंदा गतवर्षाच्या तुलनेत कापसाचा पेरा वाढणार असून सोयाबीनचा (soybeans) पेरा तब्बल २१ हजार हेक्टरने कमी होणार असल्याचे कृषी विभागाच्या प्रस्तावित अहवालात आहे. पाऊस चांगला पडणार असल्याचा अंदाजही हवामान खात्याने(Department of Meteorology) दिला आहे. त्या दृष्टीने जिल्ह्यातील शेतकरी व कृषी विभागाने खरीप हंगामासाठी पूर्वतयारी केली आहे .तसेच बळीराजाही पेरणीपूर्व मशागत करण्यात व्यस्त आहेत.
गतवर्षीच्या तुलनेत कापसाचा पेरा वाढला
जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी येणारा खरीप हंगाम महत्त्वाचा आहे. जिल्ह्यातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना आवश्यक असणाऱ्या खते, बियाणे आणि कीटकनाशके यांचा योग्य दराने व प्रमाणात पुरवठा करावा, तसेच शेतकऱ्यांची कृषी निविष्ठा बाबत कोणतीही तक्रार येणार नाही. याची दक्षता घ्यावी अशी सूचना कृषी विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागतीचे काम जवळपास पूर्ण केले आहे.खरिपाचे सर्वसाधारण क्षेत्र पाच लाख ६३ हजार हेक्टर आहे. जिल्ह्यात दरवर्षी सोयाबीन पिकाची लागवड अधिक होते. मात्र यंदा सोयाबीन चा भाव साडेचार हजाराच्या वर न गेल्यामुळे जिल्ह्यात सोयाबीन चे क्षेत्र तब्बल २१ हजाराने कमी होऊन कापसाचे क्षेत्रफळ मात्र ४४४७ हेक्टर ने वाढले आहे. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांचा कल कापूस लागवडीवर असणार हे मात्र नक्की.
शेतकऱ्यांची कापसालाच पसंती
गतवर्षीच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांची सोयाबीनलाच अधिकची पसंती होती. मात्र सोयाबीनला मिळणारा कमी दर यामुळे गतवर्षी च्या तुलनेत तब्बल २१ हजार १२४ हेक्टरने सोयाबीनचे क्षेत्रफळ कमी होऊन ४४७७ हेक्टरने कापसाचे क्षेत्र वाढले आहे. जिल्ह्यात कापसाचे क्षेत्र एक लाख ९७ हजार प्रास्तावित असून सोयाबीनचे २ लाख पन्नास हजार हेक्टर क्षेत्र यंदा प्रस्तावित आहे.
२०२४ खरीप हंगामातील पिकांचे प्रस्तावित क्षेत्र
कापूस एक लाख ९७ हजार हेक्टर ,सोयाबीन दोन लाख ५० हजार हेक्टर तूर ४५ हजार ६४० हेक्टर,मूग १६ हजार, उडीद ५ हजार,ज्वारी ४ हजार सातशे, बाजरी पाचशे,ऊस हळद व इतर ४३ हजार हेक्टर असे एकूण पाच लाख ६३ हजार ९० हेक्टर क्षेत्र परभणी जिल्ह्यातील पेरणीसाठी कृषी विभागाने प्रस्तावित केले आहे..
ज्यादा दराने विक्री झाल्यास तक्रार करण्याचे आवाहन
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यंदाच्या खरीप हंगामातील पेरणी करिता खते व बियाणे कोणत्याही कृषी निविष्ठा दुकानात जादा दराने विक्री होत असल्यास व शेतकऱ्यांना कोणतीही अडचण असल्यास त्यांनी तात्काळ परभणी पंचायत समिती कार्यालय किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालय व जिल्हा कृषी कार्यालयात संपर्क साधावा किंवा तक्रार करावी असे आवाहन तालुका कृषी अधिकारी नित्यानंद काळे यांनी दिली आहे.
शेतकऱ्यांनी बियाणांची खात्री करूनच पेरणी करावी
गतवर्षीपेक्षा यावर्षी जिल्ह्यात कापसाचा पेरा वाढनार आहे ,तर सोयाबीनचा थोड्या प्रमाणात कमी झाला आहे. शेतकऱ्यांनी बियाणांची खरेदी करताना त्याची खात्री करून कृषी निवीष्ठांकडून पक्के बिल घेऊनच बियाण्याची पेरणी करावी.शेतकऱ्यांना कोणतीही अडचण आल्यास तात्काळ जिल्हा कृषी कार्यालयात संपर्क साधावा.