महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार आयोजित!
मानोरा (Plantation) : स्थानिक ज्ञानोपासक शिक्षण प्रसारक संस्थेच्यावतीने (Local Educational Broadcasting Organization) ‘मातोश्री सुभद्राबाई पाटील कला, विज्ञान व कै. पांडुरंगजी ठाकरे महाविद्यालय, मानोरा येथे ‘एक पेड माँ के नाम’ या संकल्पनेवर आधारित वृक्षारोपणाचा स्तुत्य उपक्रम (Activity) राबविण्यात आला. महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभाग व वनस्पतीशास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.
कार्यक्रमास प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित!
या उपक्रमाचे औचित्य साधून संस्थेचे सचिव महादेव ठाकरे आणि महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. अविनाश निळे (वाणिज्य विभाग) यांच्या वाढदिवसानिमित्त फणसाच्या रोपांचे वृक्षारोपण (Plantation) करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अरविंद पाटील इंगोले व प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे संचालक सुरेश गावंडे व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नंदकिशोर ठाकरे यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन NSS कार्यक्रम अधिकारी डॉ. किशोर कोपरकर, महिला कार्यक्रम अधिकारी सौ. स्नेहल ढवळे आणि वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रा. आहेर यांच्या सहकार्याने करण्यात आले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणपूरक जाणीवा निर्माण करण्याचा सकारात्मक संदेश देण्यात आला. वृक्षारोपणानंतर उपस्थितांनी झाडांचे संगोपन करण्याचा संकल्प केला. कार्यक्रमास महाविद्यालयातील (College) विविध विभागांतील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.