राष्ट्रध्वजाचा अपमान होईल असे कोणतेही कृत्य करू नये
परभणी () : २६ जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी शहरात प्लास्टीक स्वरुपातील तिरंगी झेंडे विक्री केले जाण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्य प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या आदेशानुसार प्लास्टीक स्वरुपातील तिरंगी झेंडे (Plastic Tiranga flag) विकण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. परभणी शहर महापालिकेमार्फत सर्व नागरीक, व्यापारी यांना प्लास्टीक झेंडे, राष्ट्रध्वज वापरु नये असे आवाहन करण्यात येत आहे.
प्लास्टीक झेंड्यांची विक्री (Plastic Tiranga flag) होत असल्यास, वापर होत असल्यास संबंधितावर राष्ट्रध्वजाचा अपमान केल्या प्रकरणी कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. प्लास्टीकचा ध्वज न वापरता कापडी राष्ट्रध्वज वापरावा व उत्सवानंतर व्यवस्थित घडी करुन सांभाळून ठेवावा. राष्ट्रध्वजाचा अवमान होईल, असे कोणतेही कृत्य, वर्तन करु नये असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
२६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त (Plastic Tiranga flag) शहरात ठिकठिकाणी ध्वज व इतर साहित्य विक्रीसाठी उपलब्ध केले जातात. प्लास्टीकचे ध्वज विक्रीसाठी येऊ शकतात. या ध्वजामुळे राष्ट्रीय प्रतिकाचा अवमान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही बाब लक्षात घेता शहर महापालिकेच्या वतीने नागरीकांना आवाहन करत प्लास्टीकचे ध्वज न वापरण्याविषयी सूचना देण्यात आल्या आहेत.