परभणी (PM Awas Yojana ) : जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा विभागाच्या वतीने विविध (Gharkul Yojana) घरकुल योजनेतील ५५ हजार ९६३ लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करण्यात आले असून यापैकी ५० हजार ६३८ लाभार्थ्यांना अनुदानाचा पहिला हप्ता वर्ग करण्यात आला आहे. त्यापैकी जिल्ह्यातील ८ हजार ४२६ एवढ्या लाभार्थ्यांनी पहिला हप्ता घेऊन अद्यापही घरकुलाचे बांधकाम सुरु केलेले नाही. (PM Awas Yojana) लाभार्थ्यांनी येत्या बुधवार ३१ जुलै २०२४ पर्यंत बांधकाम सुरू करावेत, अन्यथा लाभार्थ्यांना वितरीत केलेल्या हप्त्याची रक्कम परत करावी लागणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक रश्मी खांडेकर (Rashmi Khandekar) यांनी दिली.
परभणी जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजना (PM Awas Yojana) ग्रामीण, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत आवास योजना, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना, मोदी घरकुल आवास अशा विविध घरकुल योजना अंतर्गत ग्रामीण भागातील नागरिकांना घरकुलाचा लाभ जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा विभागाच्या वतीने दिला जातो.
जिल्ह्यात ग्रामीण भागात ५५ हजार ९६३ घरकुलांना मंजुरी देण्यात आली असून त्यापैकी ५० हजार ६३८ लाभार्थ्यांना पहिला हप्ता वर्ग करण्यात आला आहे. लाभार्थ्यांनी बुधवार ३१ जुलै पर्यंत घरकुलाचे बांधकाम सुरु न केल्यास त्यांच्याकडून अनुदान वसूल करण्याची कार्यवाही सुरु करण्यात येईल.
-रश्मी खांडेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, परभणी.
बुधवार ३१ जुलै पर्यंत सुरू करावी लागणार कामे
प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) (PM Awas Yojana) अंतर्गत १८ हजार ६९२ घरकुलांपैकी १८ हजार ४७६ लाभार्थ्यांना प्रथम हप्ता वितरित करण्यात आला असून त्यापैकी ३ ह्जार ६२७ एवढे घरकुल अपूर्ण असून २ हजार ६२१ लाभार्थ्यांनी घरकुलाचे काम सुरु केलेले नाही, रमाई आवास योजना अंतर्गत २४ हजार ४२३ घरकुलांपैकी १७ हजार ४८९ लाभार्थ्यांना प्रथम हप्ता वितरित करण्यात आला असून त्यापैकी ५ हजार ४९० घरकुल अपूर्ण असून २५ लाभार्थ्यांनी घरकुलाचे काम सुरु केलेले नाहीत, शबरी आवास योजना अंतर्गत ३ हजार ८८७ घरकुल पैकी १८५२ लाभार्थ्यांना प्रथम हप्ता वितरित करण्यात आला असून ५७८ लाभार्थ्यांनी घरकुलाचे काम सुरु केलेले नाही, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत आवास योजने अंतर्गत ४४४ घरकुल पैकी ३९१ लाभार्थ्यांना प्रथम हप्ता वितरित करण्यात आला.
रमाई आवास सहीत पाच घरकुल योजनांचे लाभार्थी
त्यापैकी केवळ १२६ लाभार्थ्यांनी घरकुलाचे बांधकाम पूर्ण केले आहे, सन २०२३-२४ मधील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजने अंतर्गत ४ हजार ४०३ घरकुल पैकी २७५ लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरित करण्यात आला असून त्यापैकी ६६ लाभार्थ्यांनी घरकुलाचे बांधकाम पूर्ण केले आहे, तर मोदी घरकुल आवास योजने अंतर्गत १३ हजार ५८९ घरकुल पैकी १२ हजार १५५ लाभार्थ्यांना घरकुलाचा पहिला हप्ता वितरित केला असून यापैकी केवळ १ हजार ३९९ लाभार्थ्यांनी घरकुलाचे बांधकाम पूर्ण केले आहे.