हिंगोली (PM Awas Yojana) : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत नगर परिषदेच्या (Hingoli City council) माध्यमातून शहरात घरकुल उभारले जात आहे. आतापर्यंत १४ डीपीआरमध्ये ५१२४ घरकुलांना मंजुरी मिळाली आहे. १५ वा डीपीआर २३ डिसेंबर २०२३ रोजी पाठविला असताना सहा महिन्या पासून तो रखडल्याने घरकुलधारक लाभार्थी प्रतिक्षा करीत आहेत.
७५९ घरकुल लाभार्थी डीपीआर मंजुरीच्या प्रतिक्षेत
हिंगोली नगर परिषदेतर्फे घरकुला संदर्भात आतापर्यंत १४ डीपीआर पाठविण्यात आले आहेत. ज्यामध्ये ५१२४ घरकुल मंजूर (PM Awas Yojana) करण्यात आले असताना त्यात ५१२४ घरकुल लाभार्थ्यांना कार्यारंभ आदेश दिले आहेत. आतापर्यंत २३६३ लाभार्थ्यांचे घरकुल बांधकाम पूर्ण झाले आहे. त्यात ३०६२ लाभार्थ्यांना १२ कोटी २४ लाख ८० हजार रूपये पहिला हप्ता, २७९१ लाभार्थ्यांना २७ कोटी ९१ हजार रूपयाचा दुसरा हप्ता व २४७४ लाभार्थ्यांना १४ कोटी ८४ लाख ४० हजार रूपये तिसर्या हप्त्याची रक्कम आणि १९०५ लाभार्थ्यांना ९ कोटी ५२ लाख ५० हजार रूपयाचा चौथा हप्ता त्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आलेला आहे. आतापर्यंत १३७ लाभार्थ्यांचे घरकुल बांधकाम सुरू झाले नाही. या घरकुलांसाठी आतापर्यंत केंद्र व राज्याचे ६५ कोटी ५२ लाख ६० हजार रूपये प्राप्त झाले आहे. त्यातील ६४ लाख ५२ हजार ७० हजार रूपये लाभार्थ्यांना वितरीत करण्यात आले आहे.
हिंगोली शहरामध्ये घरकुल बांधकामे (PM Awas Yojana) जोमाने सुरू असताना नगर पालिकेने २३ डिसेंबर २०२३ रोजी १५ वा ७५९ लाभार्थ्यांचा डीपीआर नगर विकास विभागाकडे सादर करण्यात आला आहे. दरम्यान मागील काही महिन्यापूर्वी लोकसभा निवडणुकीची आदर्श आचार संहिता होती त्यामुळे बैठक झाली नाही; परंतु आदर्श आचार संहिता शिथिल होऊन बरेच दिवस उलटले तरी देखील १५ वा डीपीआर अद्यापपर्यंत मंजूर करण्यात आला नाही. अनेक लाभार्थ्यांनी घरकुलाच्या अपेक्षेने आपले जुने घर पाडून किरायाच्या घरात वास्तव्यास राहत आहेत. सध्या पावसाळा सुरू असल्याने पाणी उपलब्ध होते त्यामुळे हा डीपीआर मंजूर झाल्यास घरकुल बांधकामे जोमाने सुरू होतील यासाठी डीपीआर मंजुरीकडे लाभार्थ्यांचे लक्ष लागले आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुल (PM Awas Yojana) लाभार्थ्यांना केंद्र व राज्य शासनाचे अडीच लाख रूपये दिले जातात. हा निधी सार्वजनिक वित्तीय प्रबंधन प्रणालीद्वारे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केला जातो. हिंगोली शहरात घरकुल बांधकामे प्रगतीपथावर आहेत. मंजूर झालेल्या ५१२४ लाभार्थ्यांना कार्यारंभ आदेश दिलेले आहे. त्यात २३६३ घरकुलाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. घरकुल बांधकामात हिंगोली नगर पालिका अव्वल आहे. मुख्याधिकारी अरविंद मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली घरकुलाचे कामे टप्याटप्याने पूर्ण होत आहेत. वेळोवेळी या घरकुलांचा आढावा घेतला जातो.