पं.स. सदस्या सौ. राठोड यांचे आंदोलन
मानोरा (PM Gram Sadak Yojana) : पंतप्रधान ग्राम सडक योजनेतील निकृष्ट व दर्जाहीन रस्ते बांधून ग्रामीण नागरिक व शासनाची फसवणूक करणारे कंत्राटदार व या विभागाचे प्रशासकीय अधिकारी यांचेवर चौकशी समिती नेमून विविध गावाकडे जाणाऱ्या रस्त्याची चौकशी करण्याची मागणीसाठी पंचायत समितीच्या सदस्या छाया राठोड यांनी दिवाळीच्या दिवशी १५१ दिवे लावून दिवाळी साजरी केली.
प्रशासकीय यंत्रणा यांच्या पुढाकाराने भोयणी – नायणी – जनुना – धामणगाव या रस्त्यावर येथील शेतकऱ्यांनी दिवाळीच्या पूर्व संध्येला लक्ष्मी मातेचे पूजन करून त्या रस्त्यावर १५१ दिवे लावून दिवाळी साजरी केली. मानोरा तालुक्यातील भुली – फुलउमरी या ६ कि. मी. च्या रस्त्यावर उगलेल्या पळसाच्या व रस्त्यावरील झाडे झुडपाची ठिकाणी विधीवत पूजा करून त्या रस्त्यावरच दिवे लावण्यात आले होते. मानोरा तालुका हा सगळ्याच बाबतीत मागास असून गाव खेड्यातील रस्त्याची दैनिक अवस्था होती. या रस्त्याचे दर्जोन्नती करण्याचे काम पंतप्रधान ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून मागील पाच वर्षापासून मोठ्या प्रमाणात झाली असून सदर रस्त्याचे काम सुरू असताना या कामावर (PM Gram Sadak Yojana) ग्रामसडक योजनेचे कार्यकारी अभियंता देशमुख व उपविभागीय अभियंता खडसे यांचे अर्थपूर्ण दुर्लक्षित धोरणापाई हे लक्ष केंद्रित प्रतिकात्मक आंदोलन असल्याचे सौ. राठोड यांनी म्हटले आहे. पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत तालुक्यात निर्माण करण्यात आलेले ग्रामीण रस्ते भ्रष्टाचारामुळे काही वर्षातच रसातळाला जात आहेत.
भुली ते फुलउमरी या काही कि.मी. उपरोक्त योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या डांबरी रस्त्याच्या मधोमध चक्क पळसाचे झाड उगवल्याने संबंधित विभागाने रस्ता बांधकाम होते वेळी कंत्राटदारांकडून गुणवत्तापूर्ण बांधकाम साहित्य वापरले की नाही याकडे पूर्णपणे डोळेझाक केल्याने या भागातील नागरिक व रस्ता बांधकामासाठी कोट्यावधी रुपयाची निधी देणारे शासन दोघांचीही मोठी फसगत झाली आहे. तालुक्यातील (PM Gram Sadak Yojana) प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत बांधण्यात आलेले भूली ते फुलउमरी,आमदरी ते पाळोदी, भोयनी (नायणी ) – धामणगाव हे रस्ते निकृष्ट नसून बहुतांश रस्ते काही महिन्यातच लयास गेल्याने उपरोक्त योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या रस्त्यांची स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणीकडे सुद्धा उपरोक्त विभागाने दखल घेतली नाही. या खड्डे युक्त रस्त्यांमुळे त्रस्त नागरिकांच्या वतीने पुनरच्छ प्रशासनाकडे लक्ष वेधून सुरू असलेले व झालेल्या कामाची तातडीने दर्जात सुधारणा करण्याची वरिष्ठाकडे मागणी सौ राठोड यांनी केली आहे.