हिंगोली (PM Kisan Yojana) : सध्या स्थितीत नागरीकांच्या व्हॉट्सअॅपवर पी.एम. किसान (PM Kisan Yojana) लिस्ट अॅप फाईल या लिंकवर क्लिक केल्यास व्हॉट्अॅप हॅक होत आहे. तसेच मोबाईलमधील फोन पे व गुगल पे तसेच बँकेचे इतर अॅप्लिकेशन हॅक होत आहेत. त्यामुळे नागरीकांची फसवणूक होऊन त्यांच्या बँक खात्यातील पैसे कपात झाल्याच्या तक्रारी सायबर सेल (Cyber cell) हिंगोली येथे येत आहेत. त्यामुळे नागरीकांनी अशा फसव्या लिंकवर क्लिक करू नये, असे आवाहन (Hingoli City Police) पोलिस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
हिंगोली जिल्हा सायबर सेल तर्फे आवाहन
सायबर चोरट्यांपासुन नागरीकांनी काळजी घेण्याबाबत पोलिसांनी केलेल्या आवाहानात सदर एपीके फाईल मोबाईलमध्ये डाऊनलोड करू नये. नागरिकांनी आपल्या मोबाईल मध्ये एपीके फाईल अॅप तसेच थर्डपार्टी फाईल अॅप डाऊनलोड करू नये. आपल्या व्हाट्सअप अॅपला टू स्टेप वेरिफिकेशन कोड लावून ठेवावा जेणेकरून आपले व्हाट्सअप दुसरीकडे उघडणार नाही. तसेच आपले इंस्टाग्राम अकाउंट, फेसबुक अकाउंट यांना प्रोफाईल लॉक करून ठेवावे. (PM Kisan Yojana) आपल्या बँक खात्याचा क्रमांक, यूपीआय क्रमांक, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डचा क्रमांक तसेच इतर कोणताही ओटीपी अनोळखी व्यक्तींना सांगू नये. आपले आर्थिक नुकसान झाल्यास तात्काळ १९३० अथवा cybercrime.gov.in या वेबसाईटवर जाऊन आपली तक्रार दयावी अथवा जवळचे पोलीस स्टेशन (Hingoli City Police) किंवा सायबर सेल, हिंगोली येथे संपर्क साधावा, असे आवाहन सायबर सेलच्या वतीने करण्यात आले आहे.