मुंबई (PM Kisan Yojana) : महाराष्ट्र मंत्रिमंडळाने राज्यातील (Maharashtra Farmers) शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा देत ‘नमो किसान महा सन्मान निधी योजने’ला मंजुरी दिली आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक 12,000 रुपये मिळणार आहे. त्यापैकी 6,000 रुपये राज्य सरकार आणि 6,000 रुपये केंद्र सरकार देणार आहेत. या योजनेचा सुमारे दीड कोटी शेतकऱ्यांना लाभ होणार असल्याची घोषणा (CM Eknath Shinde) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केली. ही रक्कम वर्षभरात तीन हप्त्यांमध्ये वितरित केली जाणार आहे. हा उपक्रम केंद्र सरकारच्या (PM Kisan Yojana) पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अनुषंगाने आहे. शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता: शिंदे सरकारची मोठी घोषणा
या योजनेमुळे महाराष्ट्र सरकारवर वार्षिक 6900 कोटी रुपयांचे ओझं पडणार आहे. याशिवाय (PM Kisan Yojana) शेतकऱ्यांना फक्त एक रुपयात त्यांच्या पिकांचा विमा काढता येणार आहे. राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी 2023-24 चा अर्थसंकल्प सादर करताना याची घोषणा केली.
पात्रता आणि आवश्यकता
या (PM Kisan Yojana) योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना रहिवासी प्रमाणपत्र, आधार कार्ड, बँक खाते तपशील, उत्पन्नाचा दाखला, जमिनीची कागदपत्रे आणि मोबाईल क्रमांक आवश्यक आहे. हा निधी थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केला जाणार आहे.
नवीन वस्त्र धोरण आणि कामगार नियम
कापूस उत्पादक क्षेत्रात गुंतवणुकीला चालना देण्याच्या उद्देशाने नवीन वस्त्रोद्योग धोरणालाही (Maharashtra Farmers) महाराष्ट्र मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. या (PM Kisan Yojana) धोरणामुळे 25,000 कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित होण्याची अपेक्षा आहे. याव्यतिरिक्त, कामगारांची सुरक्षा, आरोग्य आणि कामाच्या परिस्थितीवर लक्ष केंद्रित करणारे नवीन कामगार नियम देखील मंजूर केले आहेत.