मानोरा(Manora) :- राज्य सरकारने(State Govt) १ जुलैपासून ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सुरु केली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी बहिणींची गर्दी उसळली आहे. मानोरा तालुक्यातील विविध भागात ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी ऑफलाईन (Offline) व ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे.
मानोऱ्यात लाडक्या बहिणीची बँकेत गर्दी
ऑनलाईन अर्ज (Online application) भरण्यासाठी महिलांची गर्दी होत असताना, या योजनेसाठी लागणारे बँक पास बुक(Bank pass book) झेरॉक्स, खाते क्रमांक आदींची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर महिलांनी बँक खाते उघडले नसल्याने व खात्याची केवायासी (KYC) न केल्याने त्यांची चांगलीच धावपळ सुरु झाली आहे. तालुक्यातील वेगवेगळ्या राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये नवीन खाते उघडण्यासाठी महिलांची बँकेसमोर रांग दिसून येत आहे. सकाळी १० वाजल्यापासून संध्याकाळी ६ वाजेपर्यंत बँकेत तोबा गर्दी होत आहे. तर, यापूर्वी ज्या महिलांनी बँक खाते उघडले होते. परंतु, त्याचा वापर केला नाही. त्यामुळे ते खाते नव्याने चालू ठेवण्यासाठी देखील महिलांची लगबग सुरु झाली आहेत. त्यासाठी केवायसी करण्यासाठी धावाधाव सुरु झाली आहे. अनेक बँकांमध्ये महिलांची गर्दी वाढल्याने बँक कर्मचार्यांची दमछाक होऊ लागली आहे. दैनंदिन कामांबरोबरच या योजनेसाठी नवीन खाते उघडण्यासाठी व बंद असलेले खाते चालू ठेवताना कर्मचार्यांची तारेवरची कसरत होत आहे. तर यासाठी ग्रामीण भागातील महिलांची मोठी अडचण होत असुन लहान मुलाबाळांना घेवून दिवसभर रांगेत उभे राहावे लागत आहे. त्यामुळे लाडक्या मुख्यमंञी भावाने कागदपञाचा ञास कमी करावा, अशी विनंती लाडक्या बहिणीकडून होत आहे.