नवी दिल्ली (PM Modi Cabinet) : नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. राष्ट्रपती भवनात झालेल्या शपथविधी सोहळ्यात नरेंद्र मोदींनी शपथ घेतली. यासह नरेंद्र मोदी यांनी भारताचे पंतप्रधान म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेणारे जवाहरलाल नेहरूंच्या कामगिरीची बरोबरी केली आहे. नरेंद्र मोदींसोबत (PM Modi Cabinet) अनेक खासदार मंत्रिपरिषदेचे सदस्य म्हणून शपथ घेणार आहेत. यासाठी जेपी नड्डा, (Nitin Gadkari) नितीन गडकरी, राजनाथ सिंह, पीयूष गोयल आणि ज्योतिरादित्य सिंधिया यांसारख्या भाजप नेत्यांचा समावेश आहे. याशिवाय, एचडी कुमारस्वामी JD(S) मंत्रीपदाच्या खात्यात सामील होण्याची शक्यता आहे.
इतर संभाव्य नियुक्त्यांमध्ये चिराग पासवान (LJP), राम नाथ ठाकूर JDU), आणि जीतन राम मांजी (HAM) यांचा समावेश आहे. याशिवाय जयंत चौधरी (RLD), अनुप्रिया पटेल (अपना दल (सोनीलाल), राममोहन नायडू (TDP), आणि चंद्रशेखर पेम्मासानी (TDP) हे देखील परिषदेचा भाग असण्याची अपेक्षा आहे. (PM Modi Cabinet) मंत्रिमंडळात शपथ घेणाऱ्यांमध्ये शिवसेनेचे प्रतापराव जाधव (Prataprav Jadhav) यांचाही समावेश आहे.
#WATCH | Narendra Modi takes oath for the third straight term as the Prime Minister pic.twitter.com/Aubqsn03vF
— ANI (@ANI) June 9, 2024
मोदींचे मंत्रिमंडळ तयार, 8 महिलांचा मंत्रिमंडळात समावेश
नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या तिसऱ्या कार्यकाळासाठी मंत्रिमंडळ निश्चित झाला आहे. यावेळी (Modi Cabinet) मोदी मंत्रिमंडळात 8 महिलांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये पवित्रा मार्गेरिता, अन्नपूर्णा देवी, अनुप्रिया पटेल (अपना दल), सावित्री ठाकूर, रक्षा खडसे (Raksha Khadse) , शोभा करंदलाजे, निर्मला सीतारामन आणि निमुबेन बांभनिया यांचा समावेश आहे. यापैकी (Nirmala Sitharaman) निर्मला सीतारामन यांनी अर्थमंत्रालयाचा कार्यभार स्वीकारला आहे. तर अन्नपूर्णा देवी आणि अनुप्रिया पटेल यांनी राज्यमंत्रीपद भूषवले आहे. यावेळी मोदी मंत्रिमंडळात महिलांची संख्या पूर्वीपेक्षा जास्त आहे.