नवी दिल्ली (PM Modi Cabinet) : नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली NDAने तिसऱ्यांदा सरकार स्थापन केले आहे. पंतप्रधान मोदींसह 72 मंत्रिमंडळ सदस्यांनी शपथ घेतली. तसेच आज सोमवार 10 जूनपासून नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली आहेत. यावेळी काही नव्या चेहऱ्यांना (Modi Cabinet) मोदी मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे, तर अनेक जुने चेहरेही मंत्रिमंडळात दिसत आहेत. (PM Modi) पंतप्रधान मोदींसोबत ज्यांनी शपथ घेतली, त्यात 30 कॅबिनेट मंत्री, 5 स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्री आणि 36 राज्यमंत्र्यांचा समावेश आहे.
Many congratulations to Ramdas Athawale ji, Raksha tai Khadse, Murlidhar Mohol & Prataprao Jadhav for taking oath in Hon PM Narendra Modi ji’s cabinet.
Wishing you all a successful tenure!@narendramodi @RamdasAthawale @khadseraksha @mohol_murlidhar @mpprataprao#ModiSarkar3… pic.twitter.com/1heUTlSOIR
— Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) June 9, 2024
मोदी मंत्रिमंडळाचे (Modi Cabinet) सरासरी वय किती?
पंतप्रधान मोदींसह (PM Modi) यावेळी मंत्रिमंडळात समाविष्ट सर्व 72 मंत्र्यांच्या वयाबद्दल बोलायचे झाले तर, त्यांचे सरासरी वय 59 वर्षे आहे. म्हणजेच मोदी सरकार 3.0 चे सरासरी वय 59 वर्षे आहे. मोदी सरकार 2.0 मध्ये हे सरासरी वय 61 वर्षे होते. तथापि, 2021 च्या मंत्रिमंडळ विस्तारात सरासरी वय 58 वर्षे खाली आले. यावेळेस सर्वात जुन्या मंत्र्यांबद्दल बोलायचे झाले तर HAM चे राष्ट्रीय अध्यक्ष जीतन राम मांझी हे (Modi Cabinet) मंत्रिमंडळात समाविष्ट असलेले सर्वात वयस्कर मंत्री आहेत. मांझी 79 वर्षांचे आहेत. तर सर्वात तरुण मंत्र्यांमध्ये टीडीपीचे 36 वर्षीय राममोहन नायडू आणि भाजपच्या 37 वर्षीय रक्षा खडसे (Raksha Khadse) यांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह, त्यांच्या सरकारमध्ये 70 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे सुमारे डझनभर चेहरे आहेत.