पालघर (PM Modi In Maharashtra) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. पालघरमधील सभेत पंतप्रधान मोदी (PM Modi) म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) हे माझ्यासाठी फक्त एक नाव नाही, आमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आहेत. काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्गात जे काही घडले ते… आज मी माझ्या आराध्य देवाला श्रद्धांजली अर्पण करतो. मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी मस्तक टेकवून माफी मागतो.
गेल्या वर्षी 4 डिसेंबर रोजी नौदल दिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर पंतप्रधान मोदींच्या हस्ते अनावरण करण्यात आलेला पुतळा सोमवारी कोसळला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी या घटनेचे वर्णन ‘दुर्भाग्यपूर्ण’ असल्याचे सांगून ती पूर्ववत करण्यात येईल, असे आश्वासन दिले. त्यांनी या घटनेचे श्रेय ताशी 45 किमी वेगाने वाहणाऱ्या जोरदार वाऱ्याला दिले. ज्यामुळे “नौदलाने स्थापित केलेला पुतळा पडला आणि त्याचे नुकसान झाले”. या (Chhatrapati Shivaji Maharaj) घटनेमुळे महाराष्ट्रात एक महत्त्वाचा राजकीय वाद निर्माण झाला आहे. विरोधी पक्षांनी राज्य सरकारवर टीका करत कामाच्या दर्जाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे. शिवसेनेचे (UBT) आदित्य ठाकरे यांनी सत्ताधारी भाजप सरकारचा निषेध केला आणि असे महत्त्वपूर्ण स्मारक भाजपमधील कथित भ्रष्टाचाराला बळी पडू शकते, यावर अविश्वास व्यक्त केला.
पीएम मोदी (PM Modi) म्हणाले की, आमची मूल्ये वेगळी आहेत, आम्ही ते लोक नाही जे भारतमातेचे महान सुपुत्र, महाराष्ट्राच्या शूर भूमीचे सुपुत्र वीर सावरकर यांचा अपमान करत राहतात. वीर सावरकरांना शिवीगाळ करून माफी मागायला तयार नसून, न्यायालयात जाऊन लढा देण्याची तयारी दाखवतात. पण आमची मुल्ये तशी नाहीत, आज पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पाडल्याबद्दल माफी मागतो, असे (PM Modi) त्यांनी विरोधी पक्षनेत्यांना टोला लगावला.