पुसद (Pusad BJP PM Modi) : केंद्रातील एनडीए सरकारचा (NDA Govt) शपथ ग्रहण सोहळा दि. 9 रोजी सायंकाळी सात वाजता दरम्यान संपन्न झाला. देशाच्या राष्ट्रपती यांनी पंतप्रधान पदाची नरेंद्र मोदी (PM Modi) यांना शपथ दिली. त्यांच्या समवेत कॅबिनेट मंत्री सहा राज्यमंत्री पदाची सुद्धा शपथ देण्यात आली. तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी एनडीए सरकारचे (NDA Govt) प्रमुख झालेत. त्याचा आनंद उत्सव येथील भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाक्यांच्या आतिषबाजीसह डीजेवरच्या गाण्यावर नृत्य करून मोठ्या उत्साहाने जल्लोष साजरा केला.
यावेळी (Pusad BJP) मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मानाचा मुजरा केला. यावेळी ज्येष्ठ नेते विनोद जिल्हेवार, भाजप नेत्या डॉ. आरती फुपाटे, डॉ. रूपाली जयस्वाल , शहराध्यक्ष दीपक सिंह परीहार, हेमंत आंबोरे, राजेंद्र जगताप, राजू चोपडे, सुरेश चोपडे, विश्वास भवरे, निखिल चिद्दरवार, रमेश सोमानी, भारत पाटील, सौ अनिता चव्हाण पाटील, संजय ठाकरे पाटील, प्रतीक चव्हाण पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने इत्यादी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. तर यावेळी मोठ्या संख्येने छत्रपती शिवाजी महाराज चौकात (Pusad Police) पोलीस बंदोबस्त तैनात होता. हे विशेष