नवी दिल्ली (PM Modi Chess Olympiad Team) : बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारताने दणक्यात सुवर्णपदक जिंकले. भारतीय संघाने 45व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये (Chess Olympiad) सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला होता. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी टीमची भेट घेतली आहे. पंतप्रधानांनी पुरुष संघासह महिला संघाशीही संवाद साधला. पीएम मोदी म्हणाले की, प्रत्येक क्षेत्रातील प्रभुत्व आणि कौशल्यामुळे देश समृद्ध होतो आणि त्यामुळेच देश महान बनतो. आपल्याला काहीतरी नवीन, आणखी काहीतरी करण्याची जिद्द असली पाहिजे.
#WATCH प्रधानमंत्री मोदी ने 22 सितंबर को 45वें शतरंज ओलंपियाड में स्वर्ण पदक जीतने वाली भारतीय पुरुष और महिला टीमों से बातचीत की।
प्रधानमंत्री मोदी ने कहा, "मुझे लगता है कि एक देश हर क्षेत्र में अपनी महारत और विशेषज्ञता के कारण समृद्ध होता है, और यही एक देश को महान बनाता… pic.twitter.com/SHph9ZPizN
— ANI_HindiNews (@AHindinews) September 26, 2024
विदित गुजराथी यांनी श्रोत्यांच्या संदर्भात आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले की, गेल्या काही वर्षांत प्रेक्षक आमच्यासाठी उत्साही असल्याचे दिसून आले आहे. सर्व खेळाडूंनी पीएम मोदींना भेटताना फोटोही काढले. (PM Modi) पंतप्रधानांची भेट घेतल्यानंतर खेळाडू आनंदी दिसत होते. पीएम मोदींनी प्रत्येक खेळाडूशी एक एक करून संवाद साधला. बुडापेस्ट येथे झालेल्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये (Chess Olympiad) भारताने प्रथमच सुवर्णपदक जिंकले हे विशेष. तब्बल 97 वर्षांनंतर भारताने खुल्या विभागात सुवर्णपदक जिंकले. भारताचा विजय रशियाच्या खेळाडूवर झाला. शेवटी डी गुकेशने विजय मिळवून भारताचे पदक निश्चित केले.