नामांकन सकाळी 11.40 च्या शुभ मुहूर्तावर
वाराणसी (PM Modi) : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) वाराणसीतून तिसऱ्यांदा उमेदवारी अर्ज दाखल केला. याआधी पीएम मोदी 13 मे रोजी संध्याकाळी उमेदवारी दाखल करणार होते. त्यानंतर 14 मे ही तारीख नामांकनासाठी निश्चित करण्यात आली. तेव्हापासून चर्चा होत आहे की, पीएम मोदींनी नामांकनासाठी 14 मे का निवडला. 14 मे रोजी सकाळी 11:40 वाजता नामांकनासाठी शुभ मुहूर्तही निश्चित करण्यात आला.
गंगा सप्तमीच्या मुहूर्तावर पुष्य नक्षत्रात नामांकन
गंगा सप्तमीच्या मुहूर्तावर (PM Modi) पीएम मोदींनी पुष्य नक्षत्रात नामांकन केले आहे. गंगा सप्तमीच्या निमित्ताने प्रथम (PM Modi) पीएम मोदींनी बनारसच्या दशाश्वमेध घाटावर गंगेत पवित्र स्नान केले आणि त्यानंतर 10 वाजण्याच्या सुमारास काल भैरव मंदिरात गेले. गंगा सप्तमीच्या मुहूर्तावर गंगेत स्नान केल्याने कोणत्याही कामातील मनोकामना पूर्ण होतात. यानंतर (PM Modi) पीएम मोदींनी पुष्य नक्षत्राच्या वेळी सकाळी 11.40 च्या सुमारास उमेदवारी अर्ज दाखल केला. याआधीही PM मोदींनी 26 एप्रिल 2019 रोजी सकाळी 11.55 वाजता अभिजित मुहूर्तावर उमेदवारी अर्ज दाखल केला होता. पंतप्रधान मोदी नामांकन करण्यापूर्वी पूजा करण्याची आणि शुभ मुहूर्तावर फॉर्म भरण्याची विशेष काळजी घेतात.
जाणून घ्या कोण आहेत PM मोदींचे 4 समर्थक?
यावेळी (PM Modi) पंतप्रधान मोदींचे चार प्रस्तावक पंडित गणेशवर शास्त्री, बैजनाथ पटेल, लालचंद कुशवाह आणि संजय सोनकर होते. पंडित गणेशवर शास्त्री यांनीच अयोध्येतील (Ram temple) राम मंदिराच्या अभिषेकासाठी शुभ मुहूर्त ठरवला होता. बैजनाथ पटेल हे ओबीसी समाजातून येतात. लालचंद कुशवाह हे देखील ओबीसी आणि संजय सोनकर हे दलित समाजातील आहेत.