बराकपूर (PM Modi) : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी पश्चिम बंगालमधील बराकपूर येथे निवडणूक रॅलीला संबोधित करताना सत्ताधारी टीएमसीवर जोरदार हल्ला चढवला. त्यावेळी पीएम मोदींनी पश्चिम बंगालच्या जनतेला पाच हमीपत्र दिले आहेत. (PM Modi) पीएम मोदी म्हणाले की, मी बंगालला पाच हमी देत आहे.
…जोपर्यंत मोदी आहेत तोपर्यंत…
पहिली हमी: जोपर्यंत मोदी आहेत तोपर्यंत, धर्माच्या आधारावर आरक्षण मिळणार नाही.
दुसरी हमी: जोपर्यंत मोदी आहेत तोपर्यंत, SC, ST, OBC चे आरक्षण कोणीही संपवू शकणार नाही.
तिसरी हमी: जोपर्यंत मोदी (PM Modi) आहेत तोपर्यंत, तुम्हाला रामनवमी साजरी करण्यापासून आणि रामाची पूजा करण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही.
चौथी हमी: जोपर्यंत मोदी आहेत तोपर्यंत, राम मंदिराबाबतचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय कोणीही रद्द करू शकणार नाही.
पाचवी हमी: जोपर्यंत मोदी आहेत तोपर्यंत, कोणीही CAA कायदा रद्द करू शकणार नाही.
मोदींची हमी म्हणजे पूर्ततेची हमी
पीएम मोदी PM Modi म्हणाले की, मी तुम्हाला एक माहिती देतो. काही वर्षांपूर्वी टीएमसी सरकारवर कॅगचा अहवाल आला होता. या अहवालात तृणमूल सरकारने २ लाख तीस हजार कोटी रुपयांचा हिशेब दिलेला नाही, असे म्हटले आहे. हा पैसा कुठे खर्च झाला, याचा हिशेब नाही. हा मोठा घोटाळा आहे. तृणमूल हा अत्यंत भ्रष्ट पक्ष आहे. याचे मोठे उदाहरण म्हणजे ‘शिक्षक भरती घोटाळा’. शासनाने शिक्षक भरतीसाठी रेटकार्ड बनवले होते. जी खुल्या बाजारात विकली गेली, त्यासाठी बोली लावली गेली. या घोटाळ्यासाठी (OMR Code) ओएमआर कोडचा वापर करण्यात आला. बनावट मुलाखती घेण्यात आल्या. या घोटाळ्यामागे सरकारी यंत्रणा असल्याचेही न्यायालयाला सांगावे लागले. या लोकांनी बंगालची ही अवस्था केली आहे.