पंतप्रधान मोदींचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे राजीनामा सुपूर्द
नवी दिल्ली (PM Modi Resignation) : लोकसभा निवडणुकीचा निकाल स्पष्ट झाल्यानंतर आता सरकार स्थापनेच्या प्रयत्नांना वेग आला आहे. भारतीय जनता पक्षाच्या (BJP) नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (NDA) तिसऱ्यांदा बहुमत मिळविले आहे. आज (PM Modi) पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रपती भवनात पोहोचले. त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Murmu) यांची भेट घेऊन राजीनामा सादर केला असून, तो राष्ट्रपतींनी स्वीकारला आहे. माहितीनुसार, 8 जून रोजी पीएम मोदी (PM Modi) तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेऊ शकतात.
स्वबळावर बहुमत मिळवण्यात BJP अपयशी
पंतप्रधान मोदींनी (PM Modi) आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. जिथे त्यांनी मंत्रिमंडळासह आपला राजीनामा राष्ट्रपतींकडे सुपूर्द केला. राष्ट्रपतींनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे आणि नवीन सरकार कार्यभार स्वीकारेपर्यंत त्यांना आणि मंत्रिमंडळाला पदावर राहण्याची विनंती केली आहे. यापूर्वी PM मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीचे अध्यक्षपद भूषवले होते. या बैठकीत 17वी लोकसभा विसर्जित करण्याची शिफारस करण्यात आली. सध्याच्या 17व्या लोकसभेचा कार्यकाळ 16 जून रोजी संपत असल्याची माहिती आहे. बैठकीनंतर पंतप्रधान मोदी (PM Modi) राष्ट्रपती भवनात पोहोचले. जिथे त्यांनी (President Murmu) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना लोकसभा विसर्जित करण्याची शिफारस केली आणि कॅबिनेट मंत्र्यांचा राजीनामा सुपूर्द केला.
8 जून रोजी तिसऱ्यांदा घेणार पंतप्रधानपदाची शपथ?
8 जून रोजी शपथविधी होणार असल्याचे सूत्रांच्या हवाल्याने सांगितले जात आहे. PM Modi तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेऊ शकतात. माहितीनुसार, 7 जून रोजी NDAच्या संसदीय पक्षाची बैठक होणार आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे 8 जूनला नवीन सरकारचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. यावेळी भाजपला स्वबळावर बहुमत मिळवता आलेले नाही. NDA आघाडीने 292 जागा जिंकल्या आहेत. यावेळी भाजपला केवळ 240 जागांवर समाधान मानावे लागले, तर विरोधी INDIA आघाडीला एकूण 234 जागा मिळाल्या.