शेअर मार्केटबाबत पंतप्रधान मोदी काय म्हणाले हे जाणून घ्या
नवी दिल्ली (PM Modi) : लोकसभा निवडणुका (Lok Sabha elections) अंतिम टप्प्यात आल्या आहेत. मतदानाचे पाच टप्पे पार पडले असून, आता फक्त दोन टप्पे उरले आहेत. निवडणुकीचा निकाल 4 जून रोजी जाहीर होणार आहे. निवडणूक निकालापूर्वी (PM Modi) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 4 जूनला निकाल आल्यावर (stock market) शेअर बाजार विक्रमी उच्चांक गाठेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. दरम्यान, निफ्टीने आज विक्रमी उच्चांक गाठून, 22800 चा टप्पा पार केला आहे.
सेन्सेक्स-निफ्टीने विक्रमी पातळी गाठली
निफ्टी निर्देशांकाने (Nifty Index) आज विक्रमी 22852 अंक गाठले. तर सेन्सेक्स 74917 वर पोहोचला. तो 75124 अंकांचा विक्रमी उच्चांक गाठला होता. एका मुलाखतीदरम्यान पीएम मोदी (PM Modi) म्हणाले की, तुम्ही 4 जूनची वाट पहा, ज्या दिवशी निवडणूक आयोग मतांची मोजणी करेल. (Lok Sabha elections) लोकसभा निवडणुकीच्या काळात भारतीय बाजाराने गेल्या आठवडाभरात संमिश्र प्रतिक्रिया दिल्याचे बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मात्र निवडणूक निकालाची तारीख जसजशी जवळ येत आहे. बाजारावरील गुंतवणूकदारांचा विश्वास वाढत चालला आहे.
04 जूननंतर शेअर बाजारावर काय परिणाम होईल?
बँकिंग आणि बाजार तज्ञ (Banking-market experts) अजय बग्गा यांनी सांगितले की, 14 दिवसांपूर्वी बाजाराने उच्चांक गाठल्यानंतर, गेल्या काही दिवसांत बाजाराने प्रचंड वाढ दर्शविली आहे. आज निफ्टी 50 मध्ये सर्वात मोठी वाढ (Adani Enterprises) अदानी एंटरप्रायझेसमध्ये दिसून आली. (Adani Shares) अदानीच्या शेअर्समध्ये 5 टक्क्यांची उसळी पाहायला मिळाली. ॲक्सिस बँक आणि एल अँड टीच्या शेअर्समध्येही ३ टक्क्यांनी वाढ झाली. मिडकॅप विभागाबद्दल बोलायचे झाल्यास, RVNL शेअर्समध्ये 8 टक्क्यांनी वाढ झाली. तर RFC शेअर्स 7 टक्क्यांनी वाढले. (PM Modi) पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, जेव्हा 4 जून रोजी निवडणुकीचे निकाल येतील आणि भाजपचे सरकार पुन्हा स्थापन होणार आहे. तेव्हा बाजार विक्रमी पातळीवर पोहोचेल. याआधी (Amit Shah) अमित शाह यांनीही 4 जून रोजी बाजार नवा विक्रम निर्माण करणार असल्याचे सांगितले होते.
"The stock market will break records on June 4"
PM Narendra Modi pic.twitter.com/5v8ZJ41fKh
— Fundamental Blasters (@FundamentalGems) May 19, 2024
PM मोदींचे शेअर बाजाराबाबत मोठे वक्तव्य
पीएम मोदी (PM Modi) म्हणाले की, आमच्या सरकारने जास्तीत जास्त सुधारणा केल्या आहेत आणि (Indian Economy) अर्थव्यवस्थेचे व्यवस्थापन अत्यंत विवेकाने केले आहे. शेअर बाजाराचा आपल्यावर असलेला विश्वास गेल्या दशकातील सर्वोत्तम कामगिरीवरून स्पष्टपणे दिसून येतो. जेव्हा आम्ही पदभार स्वीकारला तेव्हा (Sensex-Nifty) सेन्सेक्स 25,000 अंकांच्या आसपास होता. आज ते सुमारे 75,000 गुणांवर उभे आहे, जी ऐतिहासिक वाढ आहे. अलीकडे, आम्ही प्रथमच $5 ट्रिलियन मार्केट कॅप गाठले आहे.