चौफेर:
PM Modi : लोकसभा निवडणूक (Lok Sabha Elections) आटोपली. ३२ जागांनी भाजपला पूर्ण बहुमतापासून हुलकावणी दिली. २४० जागांवर समाधान मानावे लागले. पंतप्रधानपदाचा चेहरा आतातरी बदलेल असे वाटत असताना पांतपरधांपदाची माळ पुन्हा एकदा नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या गळ्यात पडली. एकाधिकारशाही स्वभाव असलेले मोदी आतातरी सर्वांशी जुळवून घेत एन डी ए चे सरकार चालवतील. एन डी ए तील घटक पक्षांना महत्त्व देतील असे वाटले होते. मात्र सर्व महत्त्वाची मंत्रीपदे भाजपने स्वतःकडे ठेवून ‘ सिकंदर ‘ तेच असल्याचे सिद्ध केले. इतकेच नव्हे तर आता लोकसभा अध्यक्ष भाजपचाच राहील हे जाहीर करून टाकले. महत्त्वाचे मंत्रिपद नाही मिळाले तरी चालेल, मात्र लोकसभा अध्यक्षपद द्या, असा आग्रह धरलेले तेलगू देशम पार्टीचे सर्वेसर्वा चंद्राबाबू नायडू (Chandrababu Naidu) नाराज झाले आहे.
मोदी हट्टापुढे ते काय भूमिका घेतील?
२६ जून रोजी लोकसभा अध्यक्षपदाची निवड होतेय. सध्याच्या लोकसभेत भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून लोकसभा अध्यक्ष भाजपचाच असायला हवा, यात दुमत नाही. मात्र, भाजप पूर्ण बहुमतात नाही. लहान लहान पक्ष भाजपच्या सोबत आहे. जनता दल युनायटेड आणि तेलगू देशम पार्टी या पक्षाचाही समावेश असलेले एन डी ए सध्या सत्तेत आहे, हे वास्तव आहे. सन २०१४ आणि २०१९ मध्ये एन डी ए जरी अस्तित्वात असेल तरी भाजप या एकट्या पक्षाला पूर्ण बहुमत होते. त्यामुळे भाजप, पर्यायाने (PM Modi) पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतील ती पूर्व दिशा असे चित्र होते. भाजपने जे निर्णय घेतले ते अंतिम असायचे. यातूनच ‘ मोदी सरकार ‘ हा शब्दही रूढ झाला. अगदी सन २०२४ च्या निवडणूक प्रचारापर्यंत मोदी या एक शब्दालाच स्थान होते. मोदी की गॅरंटी हा भाजपच्या जाहीरनाम्याचा आत्मा होता. मोदींच्या चेहऱ्यावर निवडणूक लढली गेली.
चूप राहतील की बंड करतील?
कदाचित हा अतिरेक झाला असावा, म्हणून की काय, ३७० चे स्वप्न बघणाऱ्या भाजपला केवळ २४० वर समाधान मानावे लागले. यामुळेच एन डी ए तील घटक पक्षांचे महत्त्व वाढले. कुबड्या वर असलेल्या भाजप सामंज्यासाची भूमिका घेईल, असे वाटत असतानाच सारी महत्त्वाची मंत्रीपदे भाजपने खिशात घातली. आता काल राजनाथ सिंग यांच्या घरी झालेल्या बैठकीत लोकसभा अध्यक्ष भाजपचाच होणार, असे जाहीर करून चंद्राबाबू यांची झोप उडविली. भाजपची ही भूमिका एन डी ए मध्ये विष कालवेल की सर्व आलबेल राहील, यांच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
चंद्राबाबू नायडू (Chandrababu Naidu) सध्या शांत आहेत. चाणाक्ष आणि अनुभवी राजकारणी आहेत. संजय गांधी (Sanjay Gandhi) यांच्या नेतृत्वाने प्रभावित झालेले नायडू १९७८ मध्ये चंद्रगिरी येथून काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले. १९७८ ते १९८२, या काळात काँग्रेसने पाच वेळा मुख्यमंत्री बदलला. तेलगू स्वाभिमान दुखवल्याबद्दल एन टी रामराव यांनी हायकमांडवर हल्ला चढविला. तेलगू देशम पार्टीची स्थापना केली. तेलगू स्वाभिमान लाटेत चंद्राबाबू नायडू यांचा पराभव झाला. यानंतर (Chandrababu Naidu) चंद्राबाबू नायडू यांनी टी डी पी मध्ये प्रवेश केला. एन टी आर यांना मुख्यमंत्री पदावरून उलटवण्याची काँग्रेसची खेळी त्यांनी हाणून पाडली आणि पक्षात ते एन टी आर यांचे विश्वस्त झाले. पुढे पक्ष वाढविण्यात त्यांची भूमिका मोलाची होती.
मोदी सरकार टिकेल का? जाणून घेऊया
१९९५ मध्ये तेलगू देशम पार्टीच्या (Telugu Desam Party) उत्तराधिकारी म्हणून एन ती आर यांनी पत्नी लक्ष्मी पार्वती यांच्याकडे धुरा सोपविण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला विरोध करत चंद्राबाबू (Chandrababu Naidu) यांनी पक्षांतर्गत सत्तांतर घडवून आणले. नायडू यांनी त्यांचे सासरे एन टी रामराव यांच्याविरुद्ध बंड थोपटले. तेव्हाच्या संयुक्त आंध्र प्रदेशचे ते मुख्यमंत्री झाले. १९९६ मध्ये १३ दिवसांचे वाजपेयी सरकार पाडून तिसरी आघाडी निर्माण करणारे चंद्राबाबू त्यानंतरच्या निवडणुकीतही कींगमेकर ठरलेत. या काळात (PM Modi) नरेंद्र मोदी यांचा संघटनेतून नुकताच राजकारणात प्रवेश झाला होता. ते सन २००१ मध्ये पहिल्यांदा (Gujarat Chief Minister) गुजरातचे मुख्यमंत्री बनले. सन २०१४ पर्यंत सलग चार वेळा मुख्यमंत्री झाले.
या संपूर्ण इतिहासावर ओझरती नजर टाकण्याचा भावार्थ समजून घ्या. मोदी जेव्हा राजकारणात कुठेही नव्हते तेव्हा राजकारणातले अनेक चढ उतार, संघटन बांधणी, राजकारणातले बंड, सत्तापालट, किंगमेकर या सर्व गोष्टी चंद्राबाबू नायडू यांनी अनुभवल्या. नायडू यांच्याकडे विकासाचे व्हिजन आहे. राज्याला आय टी क्षेत्रात अग्रेसर करण्यात त्यांचा वाटा प्रचंड मोठा आहे. सुशासन, उत्तम आणि कार्यशील प्रशासन ही चद्राबाबु (Chandrababu Naidu) यांची देण आहे. यावर्षीच्या लोकसभेत ते पुन्हा एकदा किंग मेकर म्हणून समोर आले. मोदी यांची पंतप्रधान म्हणून निवड होण्यापूर्वी अनेक आडाखे बांधण्यात आले. मात्र चंद्राबाबूनी सारेच आडाखे मोडीत काढत मोदींना पाठिंबा दर्शविला.
चंद्राबाबू नायडू (Chandrababu Naidu) हे आंध्र प्रदेशच्या विकासासंदर्भात अत्यंत महत्त्वाकांक्षी आहेत. परंतु राज्य सध्या कर्जात बुडलेल आहे. देशातील सर्वाधिक कर्ज असलेलं राज्य म्हणून सध्या त्याची ओळख आहे. सुमारे १६ लाख कोटींच्या वर ही रक्कम आहे. आर्थिक अडचणींमुळे अनेक प्रकल्प थांबलेले आहेत. राजकीय महत्वकांक्षेपेक्षा विकासाची काळजी त्यांना अधिक आहे. आंध्र प्रदेश ला विशेष राज्याचा दर्जा मिळावा, यासाठी ते आग्रही आहेत.
निधी मिळविण्यासाठी आणि विशेष राज्याचा दर्जा प्राप्त करून घ्यायचा असेल तर भाजपवर दबाव असणे आवश्यक आहे. एक दोन कुठलेही कॅबिनेट मंत्रिपद असेल तर निश्चितच हा दबाव निर्माण होऊ शकणार नाही. सत्तेवर अथवा विरोधकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी लोकसभा अध्यक्षांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. (Chandrababu Naidu) चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगू देशम पार्टीकडून अध्यक्षपद राहिले तर त्यांना राज्यासाठी हवे ते करवून घेता येईल. त्यांच्या विकास योजनांना सरकारकडून बूस्टर डोस मिळवून घेता येईल.
परंतु चंद्रा बाबूंच्या या सर्व हेतुंवर भाजपने काल पाणी फेरले. लोकसभा अध्यक्षपद भाजपकडे राहील अशी घोषणा करून एन डी ए चे सरकार असतानाही पुन्हा एकाधिकारशाही वर शिक्कामोर्तब केले. अध्यक्षपद आपल्याकडे ठेवण्यामागे भाजपची मोठी खेळी असू शकते, असा एक सूर उमटत आहे. महाराष्ट्र आणि बिहार मध्ये भाजपने मुख्यमंत्री सहयोगी पक्षाचा केला असला तरी विधानसभा अध्यक्षपद स्वतःकडे ठेवले. अध्यक्षपदाच्या जोरावर महाराष्ट्रात भाजपने काय काय केले हे सऱ्यानाच ठाउक आहे. सर्वोच्च न्यायालयाने घडलेल्या सर्व प्रकारची दखल घेत महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांचे कान टोचले, हे उभ्या देशांन अनुभवलं. अध्यक्ष संपूर्ण सत्तेवर नव्हे तर विरोधकांवर कसा कंट्रोल ठेवू शकतो, याचे उदाहरण भाजपने भारतीय राजकारणात घालून दिले. हाच प्रयोग आता केंद्राच्या राजकारणात करण्याचे मनसुबे तर भाजप बाळगून नाहीत ना, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झालं आहे. त्याला कारणही तसेच आहे. भाजपचे २४० खासदार आहे. छोटे छोटे पक्ष फोडून ३२ खासदार जुळवायचे आणि पक्ष म्हणून पूर्ण बहुमतात यायचे हा डाव लोकसभा अध्यक्षांच्या मदतीने तडीस नेण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याची कुजबुज आहे. कदाचित हे खरे असेलही. आणि म्हणूनच हा सारीपाट मांडणे सुरू आहे.
हा डाव कदाचित चंद्राबाबू नायडू (Chandrababu Naidu) ओळखून असतीलही. मात्र आंध्र चा विकास हा एकमेव अजेंडा त्यांच्या डोक्यात असल्याने ते सावध पवित्रा घेत आहेत. अनुभवाने राजकारणात ते (PM Modi) मोदींपेक्षा ज्येष्ठ आहेत. त्यांनी भाजपला आतापर्यंत पूर्ण संधी दिली. मात्र भाजप त्यांची संधी हिरावून नेट असेल तर मोदींना धोबिपछाड द्यायला ते मागेपुढे बघणार नाहीत. दिवस दूर नाहीत. विरोधकही शिकारीसाठी आकडा टाकून बसले आहेत. २२ तारखेनंतर सारेच स्पष्ट होईल.