नवी दिल्ली (PM Modi) : नरेंद्र मोदी (narendra modi) यांनी सलग तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. (PM Modi) पंतप्रधानपदाची शपथ घेताना मोदी म्हणाले की, मी नरेंद्र दामोदरदास मोदी, तिसऱ्यांदा शपथ घेत आहे. नरेंद्र मोदींनंतर राजनाथ सिंह यांनी सर्वप्रथम शपथ घेतली. यानंतर अमित शहा, नितीन गडकरी (Nitin Gadkari) , जेपी नड्डा आणि शिवराज सिंह चौहान यांनी शपथ घेतली. यानंतर निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman), एस जयशंकर आणि मनोहर लाल खट्टर यांनी शपथ घेतली.
येथे CLICK करा : मोदींनी तिसऱ्यांदा घेतली पंतप्रधानपदाची शपथ; आणखी कोण घेणार शपथ?
#WATCH | Narendra Modi takes oath for the third straight term as the Prime Minister pic.twitter.com/Aubqsn03vF
— ANI (@ANI) June 9, 2024
मागील 24 वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी संविधानाची शपथ घेण्याची ही 7 वी वेळ आहे. 2014 मध्ये नरेंद्र मोदी (narendra modi) पहिल्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून निवडून आले. त्यानंतर 2019 मध्ये नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान झाले. आता 2024 मध्ये नरेंद्र मोदींनी (narendra modi) तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे. देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणारे पंतप्रधान मोदी (PM Modi) हे पहिले बिगर काँग्रेसी आहेत. त्यांच्या शपथविधीपूर्वी ‘मैं नरेंद्र दामोदरदास मोदी…’ हा सोशल मीडियावर टॉप ट्रेंड आहे.
2001 ते 2024 पर्यंत नरेंद्र मोदींची शपथविधी
– 09 जून 2024: 74 व्या वर्षी नरेंद्र मोदींनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली.
– 30 मे 2019: 69 वर्षांचे नरेंद्र मोदी (narendra modi) यांनी सलग दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली.
– 26 मे 2014: नरेंद्र मोदी, (वय 64) यांनी पहिल्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.
– 26 डिसेंबर 2012: नरेंद्र मोदी, (वय 62) यांनी सलग चौथ्यांदा गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
– 25 डिसेंबर 2007: नरेंद्र मोदी (narendra modi), (वय 57) यांनी सलग तिसऱ्यांदा गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
– 22 डिसेंबर 2002: नरेंद्र मोदी, (वय 52) यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
– 7 ऑक्टोबर 2001: नरेंद्र मोदी, (वय 51) यांनी पहिल्यांदा गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.