वाशिंग्टन (PM Modi US Visit) : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी त्यांच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान व्हाईट हाऊसमध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्यासोबत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली. यावेळी पंतप्रधान मोदींनी (PM Modi) बेकायदेशीरपणे राहणाऱ्या भारतीयांच्या (Illegal Indians) मुद्द्यावर कठोर भूमिका घेतली आहे. त्यांनी सांगितले की, भारत आपल्या सत्यापित नागरिकांना परत घेण्यास पूर्णपणे तयार आहे. परंतु मानवी तस्करीचे जाळे उखडून टाकण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. मोदींनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना या दिशेने संयुक्त कारवाई करण्याचे आवाहन केले.
पंतप्रधान मोदींनी (PM Modi) स्पष्टपणे सांगितले की, जे लोक दुसऱ्या देशात (Illegal Indians) बेकायदेशीरपणे राहतात, त्यांना तिथे राहण्याचा कायदेशीर अधिकार नाही. जर कोणताही भारतीय अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहत असेल आणि तो सत्यापित नागरिक असेल तर भारत त्याला परत घेण्यास तयार आहे, असेही त्यांनी सांगितले. अलिकडेच अमेरिकेने 100 हून अधिक भारतीयांना जबरदस्तीने देशाबाहेर काढले. ज्यामुळे भारतात राजकीय वादविवाद सुरू झाला. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी हा मुद्दा अमेरिकन अधिकाऱ्यांसमोर उपस्थित केला आहे.
मानवी तस्करीविरुद्ध कठोर कारवाईची आवश्यकता
मोदींनी या विषयावर तीव्र चिंता व्यक्त केली आणि सांगितले की, अनेक भारतीय मानवी तस्करांना बळी पडतात आणि (Illegal Indians) बेकायदेशीरपणे अमेरिकेत पोहोचतात. हे सामान्य कुटुंबातील लोक आहेत, ज्यांना सोनेरी स्वप्ने दाखवून दिशाभूल केली जाते. आपण हे संपूर्ण मानवी तस्करीचे जाळे उखडून टाकले पाहिजे. पंतप्रधान मोदींनी (PM Modi) राष्ट्राध्यक्ष ट्रम्प (Donald Trump) यांना या तस्करी रॅकेटचा अंत करण्यासाठी भारताशी हातमिळवणी करण्याचे आवाहन केले आणि सांगितले की, ही लढाई केवळ बेकायदेशीर स्थलांतरितांविरुद्ध नाही तर त्यांच्या मागे काम करणाऱ्या संपूर्ण व्यवस्थेविरुद्ध आहे.
भारत अमेरिकेत दोन नवीन वाणिज्य दूतावास उघडणार
पंतप्रधान मोदींनी (PM Modi) अमेरिकेतील भारतीय समुदायाच्या भूमिकेचे कौतुक केले आणि सांगितले की, भारत लवकरच लॉस एंजेलिस आणि बोस्टनमध्ये दोन नवीन वाणिज्य दूतावास उघडणार आहे. यामुळे दोन्ही देशांमधील सांस्कृतिक आणि व्यापारी संबंध आणखी मजबूत होतील. त्यांनी असेही सांगितले की, भारताने अमेरिकन विद्यापीठांना भारतात त्यांचे (Illegal Indians) कॅम्पस उघडण्यासाठी आमंत्रित केले आहे, ज्यामुळे उच्च शिक्षण क्षेत्रात दोन्ही देशांमधील सहकार्य वाढेल.