नाशिक (PM Modi) : नाशिक जिल्ह्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांची विराट सभा घेऊन शक्तिप्रदर्शन करण्याच्या मनसुभ्याला प्रचंड तडे गेल्याचे दिसून येत आहे. निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथे साठ एकर जागेवर मोदींची सभा होणार होती. तथापि, कांदा उत्पादकांचा संताप लक्षात घेऊन १० तारखे ऐवजी ही सभा १५ तारखेला घेण्यात येणार आहे. तसेच साठ एकर मैदानावरून ही सभा सहा एकरवर घेण्यात येणार आहे. (BJP) भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक नेत्यांना व कार्यकर्त्यांना तो एक धक्काच असल्याचे जाणवू लागले आहे.
गुप्तचर यंत्रणेने केंद्रीय यंत्रणेस प्रतिकूल अहवाल दिल्याचे समजते. कांदा प्रश्नावरून (Mahayuti candidate) महायुतीच्या उमेदवारांना शेतकऱ्यांच्या संतापाला सामोरे जावे लागत असल्याने भारतीय जनता पक्षाचे नेते चिंताक्रांत झाले आहे. त्याचा परिणाम (PM Modi) मोदी यांच्या सभेवरही होण्याची शक्यता असल्याचेसमजते. दिंडोरीसह नाशिकमध्ये लोकसभा मतदार संघात २० तारखेला मतदान होणार आहे. एखादेवेळी पिंपळगाव बसवंतऐवजी नाशिकमध्ये सभा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी (Nashik Police) नाशिक ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयात या सभेबाबत आढावा घेतला.
ग्रामीण पोलीसांच्या (Nashik Police) बंदोबस्ताच्या नियोजनात ढिसाळपणा निदर्शनास आल्याने पोलीस महासंचालकांनी या सभेबाबत जागा बदल सुचविले आहे. तसेच कांदाप्रश्नी आंदोलन वा निदर्शने करणाऱ्या शेतकरी, कार्यकर्त्यां विरोधात कारवाई केली तरी अडचण व नाही केली तरी अडचण होण्याची शक्यता व्यक्त केली. या सर्व बाबींचा विचार करून केवळ औपचारिकता म्हणून सभा घ्यायची असेल तर त्यात अर्थ नाही, असेही म्हटले जाते.