बापूंची काँग्रेस आजचा सर्वाधिक भ्रष्टाचारी पक्ष
– संजय तिगांवकर
वर्धा (PM Narendra Modi) : देशातला आजचा सर्वाधिक भ्रष्ट पक्ष काँग्रेस आहे. महात्मा गांधी (Mahatma Gandhi) ज्या काँग्रेस पक्षात होते, तो काँग्रेस पक्ष आता उरला नाही. आजची काँग्रेस देशात द्वेष पसरवत आहे. तुकडे तुकडे गँग आणि (Urban Naxal) अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत असल्याचा गंभीर आरोप देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी केला. वर्धा येथील स्वावलंबी विद्यालयाच्या मैदानावर पी. एम. विश्वकर्मा योजनेच्या लाभाचे वितरण, अमरावती येथील पी एम मित्र पार्कचा शुभारंभ आणि आचार्य चाणक्य कौशल्य विकास योजना व पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्ट अप योजनेच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.
मागासवर्गीयांची सातत्याने केली उपेक्षा
यावेळी मंचावर राज्यपाल डॉ. सी.पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), केंद्रीय मंत्री जीतन राम मांझी, केंद्रीय राज्यमंत्री जयंत चौधरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, आमदार दादाराव केचे, समीर कुणावार, डॉ. पंकज भोयर, माजी खासदार रामदास तडस उपस्थित होते.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने कहा, "विश्वकर्मा योजना की मूल भावना है- सम्मान, सामर्थ्य और समृद्धि ! यानी पारंपरिक हुनर का सम्मान, कारीगरों का सशक्तिकरण और विश्वकर्मा बंधुओं के जीवन में समृद्धि! ये हमारा लक्ष्य है।" pic.twitter.com/ZFy6gsXvb3
— ANI_HindiNews (@AHindinews) September 20, 2024
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी काँग्रेस पक्षावर चांगलाच हल्लाबोल केला. पुढे बोलताना ते म्हणाले, तेलंगणामध्ये निवडणुकीपूर्वी काँग्रेसने कर्जमाफीचे आश्वासन दिले. त्यांची सरकार बनली. मात्र कर्जमाफीचे आश्वासन हवेत विरले. कर्ज माफीसाठी शेतकरी भटकत आहेत.याच काँग्रेसने स्वातंत्र्यानंतर सर्वाधिक सत्ता उपभोगली. मात्र, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी या मागासवर्गीय घटकांना कधीच पुढे जाऊ दिले नाही. त्यांची कायम उपेक्षा केली. आजच्या काँग्रेसमधून देशभक्ती लुप्त झाली आहे. खोटारडेपणा, धोका, बेइमानी हेच आता काँग्रेसचे तत्व आहे. विदेशात जाऊन समाजाला, देशाला तोडण्याची भाषा काँग्रेस करत आहे. देशाचा सर्वात भ्रष्ट परिवार कोणी असेल तर काँग्रेसचा शाही परिवार आहे, असा अप्रत्यक्ष हल्ला त्यांनी गांधी परिवारावर चढवला.
मोदी (PM Narendra Modi) पुढे बोलताना म्हणाले, सामाजिक सौहार्द, एकता आणि जनजागृतीसाठी लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरू केला. त्या गणेशोत्सवालाही काँग्रेसने विरोध केला. गणपतीच्या मूर्तीला जेलमध्ये टाकले. तमाम महाराष्ट्रातील जनतेच्या श्रद्धेला ठेच पोचवली. जनतेच्या श्रद्धेला ठेच पोचविणाऱ्या, शेतकऱ्यांना दारिद्र्याच्या दरीत लोटणाऱ्या आणि अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि ओबीसी बांधवांना पुढे जाऊ न देणाऱ्या काँग्रेस पक्षाला आता पुन्हा महाराष्ट्रात संधी देऊ नका, असे आवाहन (PM Narendra Modi) त्यांनी यावेळी उपस्थित जनसमुदायाला केले.