नवी दिल्ली (PM Narendra Modi) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शुक्रवारी देशाच्या 78 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त त्यांच्या मायक्रोब्लॉगिंग साइट X वरील प्रोफाइल फोटो बदलून ‘तिरंगा’ केला आहे. “हर घर तिरंगा” (Har Ghar Tiranga ) मोहिमेच्या तिसऱ्या आवृत्तीचा प्रचार करताना, PM मोदींनी प्रत्येकाला त्यांचे प्रोफाइल चित्र तिरंग्यात बदलून “हर घर तिरंगा” ला पुन्हा एक संस्मरणीय जनआंदोलन बनवण्याची विनंती केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) म्हणाले की, जसा या वर्षीचा स्वातंत्र्यदिन जवळ येत आहे, तसा आपण पुन्हा प्रत्येक घरात तिरंगा एक संस्मरणीय जनआंदोलन बनवूया. मी माझे प्रोफाईल पिक्चर बदलत आहे आणि मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की, असे करून आपल्या (Independence Day) तिरंगा साजरा करण्यात माझ्यासोबत सामील व्हा.
As this year’s Independence Day approaches, let’s again make #HarGharTiranga a memorable mass movement. I am changing my profile picture and I urge you all to join me in celebrating our Tricolour by doing the same. And yes, do share your selfies on https://t.co/0CtV8SCePz
— Narendra Modi (@narendramodi) August 9, 2024
केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी सांगितले की, 78 व्या (Independence Day) स्वातंत्र्य दिनाच्या स्मरणार्थ ‘हर घर तिरंगा’ मोहिमेची तिसरी आवृत्ती 9 ते 15 ऑगस्ट दरम्यान साजरी केली जाणार आहे. मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी नागरिकांना घरोघरी तिरंगा फडकावण्यास, ध्वजासह सेल्फी घेण्यास आणि HGT पोर्टलवर अपलोड करण्यास सांगितले आहे. या मोहिमेचे मुख्य आकर्षण म्हणजे संसद सदस्यांची खास ‘तिरंगा बाइक रॅली’, जी 13 ऑगस्ट रोजी दिल्लीत होणार आहे. (PM Narendra Modi) ही रॅली भारत मंडपम, प्रगती मैदान येथून सुरू होईल आणि इंडिया गेटमार्गे मेजर ध्यानचंद स्टेडियम येथे संपणार आहे.