वर्धा (PM Narendra Modi) : पीएम विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा वर्धा येथे शासकीय दौरा होता. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. सुरक्षेच्या दृष्टीने विरोधी पक्षातील अनेक स्थानिक नेत्यांना पोलिसांनी नजरकैदेत ठेवले होते. नागपुरला जायचे असलेल्या नेत्यासोबतही चक्क पोलिस गेले होते. त्यामुळे नेत्यांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे.
विश्वकर्मा योजनेसाठी अठरा पगड जातीतील लाभार्थ्यांना धनादेश वितरित करण्याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) वर्धा येथील स्वावलंबी विद्यालयाच्या मैदानावर आयोजित कार्यक्रमाकरिता येणार असल्याने शहरातील विरोधी पक्षातील अनेक नेत्यांना (Police custody) पोलिसांनी नजरकैदेत ठेवले. काँग्रेसचे शेखर शेंडे यांच्या घरी सकाळी पोलिसांनी हजेरी लावली. पोलिसांना त्यांनी विचारल्यावर त्यांनी आम्ही सहज आलो, असे सांगितले. त्यांना नागपूरला जायचे होते.
पोलीस (Police custody) त्यांच्यासोबत नागपूरपर्यंत गेले. दुपारी तीन वाजेपर्यंत कार्यक्रम संपेपर्यंत त्यांच्यासोबत होते. दुसरीकडे किसान अधिकार अभियानचे प्रणेते अविनाश काकडे यांना पोलिस एक दिवस अगोदर पोलीस मुख्यालयात घेऊन गेले. काकडे यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांनी घरी जाण्याची विनंती केली. रात्री त्यांनी घरी मुक्काम केला. पुन्हा पहाटे सहा वाजता पोलीस त्यांच्याकडे त्यांना घ्यायला गेले.
शुक्रवाारी दुपारी साडेतीन वाजता सभा आटोपल्यानंतर (Police custody) पोलिसांनी त्यांना सोडले. दोन दिवसापासून काकडे नजर कैदेत होते. तुषार उमाळे, चंद्रशेखर मडावी यांनासुद्धा नजर कैदेत ठेवले. सेवाग्राम पोलीस स्टेशनमध्ये तिन्ही लोकांना ठेवण्यात आले. दरम्यान, ब्रिटिश मानसिकतेच्या या हुकूमशाही सरकारचा जाहीर निषेध करीत आहे, अशी प्रतिक्रिया संभाजी ब्रिगेडचे तुषार उमाळे यांनी दै. देशोन्नतीशी बोलताना व्यक्त केली.