सरकारी कार्यक्रमात पंतप्रधानांनी विधानसभेच्या प्रचाराचे फोडले नारळ ?
– संजय तिगावकर
वर्धा (PM Narendra Modi) : पीएम विश्वकर्मा योजना वर्षापूर्तीकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) वर्धा येथे आले होते. सभा मंडप भरगच्च जनसमुदायाने भरला होता. याच गर्दीत पंतप्रधानांनी सुरुवातीला सरकारी कार्यक्रमाचे औचित्य साधून विश्वकर्मा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले. केंद्र सरकारच्या योजनांची माहिती दिली. मात्र या भाषणादरम्यान पंतप्रधानांनी विरोधकांवर टीका करत जवळपास दहा मिनीट राजकीय भाषण केले. महाराष्ट्रात होणार्या विधानसभेच्या प्रचाराचे नारळ फोडण्यासाठी ही सभा घेतली, असा आरोप काँग्रेसचे शेखर शेंडे यांनी केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी २०१४ निवडणूक प्रचाराकरिता (Wardha election campaign) वर्धेत पहिल्यांदा आले होते. त्यानंतर त्यांची दुसरी भेट सुद्धा २०१९ मध्ये स्वावलंबी विद्यालयाच्या प्रांगणात प्रचार सभा घेऊन झाली होती. तिसरी भेट वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यात तळेगाव श्यामजी पंत येथे राजकीय प्रचारासाठीच दिली होती. आज २० सप्टेंबरला (PM Vishwakarma Yojana) विश्वकर्मा योजना वर्षापूर्ती कार्यक्रमाकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची सरकारी भेट होती. गेल्या तीन आठवड्यापासून जिल्हा प्रशासन रात्रंदिवस सभामंडप, प्रदर्शनी हेलिपॅड या सर्व कामात कामाला लागली होती.
लाखो रुपयांचा खर्च या कार्यक्रमाला प्रशासनाद्वारे करण्यात आला. त्यामुळे स्थानिक नेत्यांनी आजच्या भाषणावर अनेक प्रश्न उपस्थित केले. जनतेच्या पैशात शासकीय कार्यक्रम घेतला. परंतु या कार्यक्रमात राजकीय भाषण अपेक्षित नव्हते. (Wardha election campaign) विधानसभेच्या प्रचारासाठी हा शासकीय कार्यक्रम होता का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. पंतप्रधानांनी शेतीमालाच्या भावाबाबत साधा शब्द सुद्धा उच्चारला नाही. बेरोजगारांबाबत काहीच भाष्य केले नाही. देशोन्नतीशी संवाद साधताना काँग्रेस नेते शेखर शेंडे यांनी (PM Narendra Modi) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण शासकीय खर्चात राजकीय असल्याची टीका केली.