हिंगोली (PM Narendra Modi) : सेनगाव तालुक्यातील केंद्रा बुद्रुक येथून जवळ असलेल्या ताकतोडा येथील सरपंच सौ जया शिवाजी मानमोठे यांना पंचायत राज मंत्रालयाकडून दिल्ली येथील लाल किल्ल्यावर होणाऱ्या ध्वजारोहण प्रसंगी उपस्थित राहण्यासंबंधी आमंत्रण देण्यात आले होते. त्या अनुषंगाने ताकतोडा येथील महिला सरपंच जया शिवाजी मानमोठे (Sarpanch Jaya Manmothe) हे दिल्लीसाठी रवाना होऊन १४ ऑगस्ट रोजी देशाचे (PM Narendra Modi) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी थेट भेट होऊन संवाद साधण्यात आला.
यावेळी पंतप्रधानांनी सरपंच यांच्याशी संवाद साधून विचारपूस केल्याचे सांगण्यात आले आहे. सर्वसामान्य कुटुंबातील महिला सरपंच झाल्याने थेट दिल्ली गाठून देशाच्या पंतप्रधानांनी त्यांच्याशी संवाद साधल्याने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. एकंदर ताकतोडा या छोट्याशा गावातून सरपंच झालेल्या जया शिवाजी मानमोठे (Sarpanch Jaya Manmothe) यांच्याशी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी संवाद साधला आहे.