पत्रकार परिषदेत पालकमंत्री ना. राठोड यांनी दिली माहिती
मानोरा (PM Narendra Modi) : बहुजन बंजारा समाजाची तिर्थक्षेत्र पोहरादेवी येथे बंजारा विरासत नंगारा म्युझियमचे लोकार्पण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा दौरा २६ सप्टेंबर रोजी आयोजित केला होता, मात्र त्यांचा पोहदेवीचा दौरा आता ते नवरात्र उत्सवात ५ ऑक्टोंबर रोजी सकाळी १० वाजता पार पडणार आहे, अशी माहिती दि. २० सप्टेंबर रोजी पोहरदेवीत पालकमंत्री संजय राठोड (Sanjay Rathore) यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली.
२६ सप्टेंबर ऐवजी नवरात्रोत्सवात ५ ऑक्टोंबरला येणार
यावेळी पत्रकार परिषदेला धर्मगुरु बाबुसिंग महाराज, महंत जितेंद्र महाराज, भक्तराज राठोड महाराज, पराग पिंगळे आदिंची उपस्थिती होती. पुढे ना. राठोड म्हणाले की, पोहरादेवीत बंजारा विरासत नंगारा म्युझियमच्या लोकार्पण सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे येणार आहेत. आता त्यांच्या दौऱ्याची तारीख पुढे ढकलण्यात आली असुन २६ सप्टेंबर ऐवजी नवरात्रोत्सवात ५ ऑक्टोंबरला येणार आहेत. आणि देवी जगदंबा माता तसेच संत सेवालाल महाराज, संत रामराव बापू यांच्या समाधीस्थळी दर्शन घेतल्यावर बंजारा विरासत नंगारा म्युझियमचे लोकार्पण करून सभा स्थळी उपस्थित जनसमुदायाला संबोधित करणार आहेत, अशी (Sanjay Rathore) पत्रकार परिषदेत माहिती दिली.