इंधन आणण्यासाठी महिला भर उन्हात जंगलात
मानोरा (PM Ujwala Yojana) : चारशे रुपयात मिळणारा गॅसचे भाव दुप्पट म्हणजेच 830 रुपयाच्या घरात पोहोचल्याने ग्रामीण भागातील गरीब कुटुंबातील महिलांना तो परवडेनासा झाला आहे. (PM Ujwala Yojana) उज्वला योजनेअंतर्गत 100 रूपयात मिळालेला गॅस महाग झाल्याने महिला पावसाळा अगोदर जंगलात जाऊन वणवण भटकंती करत, इंधन डोक्यावर आणून चुली पटविण्याचे नियोजन करतांना दिसत आहे.
ग्रामीण भागातील महिलांना चुलीच्या धुर पासून मुक्त करण्यासाठी दारिद्रय रेषेखालील कुटुंबांना (PM Ujwala Yojana) प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत शंभर रुपयात गॅस कनेक्शन देवून केंद्र सरकारने मुक्तता केली. त्यावेळी तालुक्यातील हजारो दारिद्रय रेषेखालील महिलांना उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत गॅस मिळाला. परंतू गॅसच्या वारंवार होणाऱ्या भाव वाढीमुळे गरीब कुटुंबाच्या आता आनंदावर विरजण पडले आहे. (PM Ujwala Yojana) गॅस परवडत नसल्याने गरीब कुटुंबातील महीला चुली पेटविणेसाठी डोक्यावर जळतन आणून आपली गरज भागवीत आहे.