विषारी सापाने दंश केल्याने मृत्यू झाल्याची घटना
गडचिरोली(Gadchiroli):- तालुक्यातील मालेवाडा जवळील फरी येथील शेतकरी शेतात गेला असता तेथे त्याला विषारी सापाने दंश केल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. सविस्तर वृत्त, की धान कापनी सुरु आहे. मागील एक दोन दिवसांपुर्वी परिसरात अवकाळी पाऊस(Unseasonal rain) पडल्यामुळे शेतात पाणी साचून ओलावा झाला आहे. शेतातील साचलेल्या पाण्यामुळे धान कापनी करता येईल का हे बघण्यासाठी फरी येथील शेतकरी देवानंद सदानंद मडावी वय ३८ वर्षे शेतात गेला असता, शेतातच त्याला सर्प दंश (Snake bite)झाला. प्रथमोपचार करिता त्याला मालेवाडा येथील आरोग्य केंद्रात(Health Centers) उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथुन पुढील उपचारासाठी कुरखेडा उप जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले,परंतु रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला.