हिंगोली(Hingoli):- हिंगोली शहरातील पेन्शनपूरा कुरेशी गल्ली भागातून ७ मे रोजी रात्रीच्या सुमारास हिंगोली शहर पोलिसांनी(Hingoli City Police) पकडलेल्या ४४ जनावरांच्या खरेदी विक्रीचा पुरावाच सादर न केल्याने अखेर हिंगोली शहर पोलिसांनी १५ जणांवर बुधवारी पहाटे च्या सुमारास गुन्हा दाखल (Filed a case) करण्यात आला आहे.
जनावरे कत्तलीसाठी नेले जाणार असल्याची माहिती
हिंगोली शहरातील पेन्शनपूरा कुरेशी गल्ली भागात ७ मे रोजी काही जनावरे कत्तलीसाठी नेले जाणार असल्याची माहिती हिंगोली शहर पोलिसांच्या पथकाला मिळाली होती. त्यावरून पोलिस अधिक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी मारुती थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक नरेंद्र पाडळकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक बोधगिरे, गजानन मोरे, उपनिरीक्षक कपील आगलावे, सतीष ठेंगे, जमादार अशोक धामणे, संभाजी लकुळे, धनंजय क्षिरसागर, संजय मार्के यांच्या पथकाने प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली असता काही वेगवेगळ्या घरांमध्ये ४४ गोवंश जनावरे आढळून आली. पोलिसांच्या पथकाने सर्व जनावरे वाहनातून हिंगोली शहर पोलिस ठाण्यात आणली होती. या प्रकरणात पोलिसांनी संबंधित व्यक्तींना गोवंश (bovine)जनावरांची खरेदी केलेल्या व्यक्तींना पुरावे सादर करण्याच्या् सूचना दिल्या होत्या. दोन दिवस पशु प्रेमी व हिंगोली शहर पोलिसांनीच जनावरांचा चारा पाणी केल्यानंतर हि जनावरे वैजापूर येथील गोशाळेत सोडण्यात आली होती.
दरम्यान, या प्रकरणात सात दिवसानंतरही गोवंश जनावरांच्या खरेदी विक्रीच्या पावत्या व इतर पुरावे सादर करण्यात आले नाही. तर काही जणांनी वाशीम येथील कृषी उत्पन्न बाजार(Agricultural produce market) समितीच्या पावत्या सादर केल्या होत्या. या पावत्यांची पडताळणीही पोलिसांनी केली होती. मात्र या पावत्यांचा ताळमेळ लागलाच नाही. त्यानंतर १५ मे बुधवार रोजी पहाटे पोलिस निरीक्षक नरेंद्र पाडळकर यांनी हिंगोली शहर पोलिसात तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी मोहमद शाहिद अब्दूल वहिद, शाईन नाईक मतीन नाईक, शेख अन्वर शेख शरीफ, शेख जलील शेख अहेमद, शेख सद्दाम शेख ख्वाजा, शेख पाशा शेख नजीर, शेख गणी शेख नुर, सय्यद अली सय्यद नुर, मोहमद अनीस मोहमद युनुस, शेख मुजीब शेख मोाईन, शेख फेरोज शेख फकिर, शेख अरबाज, ज्ञानेश्वर शंकर तरखे, शेख लियाकत शेख रज्जाक, अहेमद हुसेन शेख आयुब यांच्या विरुध्द महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. उपनिरीक्षक सतीश ठेंगे पुढील तपास करीत आहेत. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपींच्या अटकेसाठी पोलीस पथकही रवाना केले असल्याचे सूत्राकडून समजते.