परभणी/जिंतूर (Parbhani) :- येथील पोलीसांच्या पथकाने शुक्रवार २ ऑगस्ट रोजी सकाळी ८.४५ च्या सुमारास अकोली येथे केलल्या कारवाईत (action) ५० हजार ४०० रुपये किंमतीचा अवैध गुटखा पकडला आहे. याप्रकरणी एकुण ४ जणांवर जिंतूर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परभणीच्या जिंतूर तालुक्यातील अकोली येथे छापा
पोहेका गणपती मुरकुटे यांनी तक्रार दिली आहे. पोलीसांचे पथक अवैध धंद्याची(Illegal business) माहिती काढत गस्त घालत होते. या पथकाला अकोली येथे अवैध गुटखा साठवून ठेवला असल्याची माहिती मिळाली. सदर माहितीच्या आधारे पोलीसांनी छापा टाकला. त्यांना राजनिवास, प्रिमीयम झेड एल, जाफराणी जर्दा एसा एकुण ५० हजार ४०० रुपये किंमतीचा गुटखा मिळुन आला. याप्रकरणी सुरेश डोंबे, सोपान डोंबे, एकनाथ डोंबे आणि इतर एका वाहन चालकावर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तपास सपोनि दिक्षा लोकडे करत आहेत. दरम्यान मागील काही दिवसात जिंतूर व परिसरात अवैध धंदे वाढल्याचे दिसत आहे.