पोलीस भरती तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची मागणी
परभणी/गंगाखेड (Police Bharti) : आगामी काळात येणाऱ्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी पोलीस भरतीची जाहिरात काढावी व वयोमर्यादेची अट शिथील करावी अशी मागणी पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री यांच्याकडे केली आहे.
अहोरात्र परिश्रम घेऊन (Police Bharti) पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुण युवक, युवतींचे नुकसान होऊ नये यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी पोलीस भरतीची जाहिरात काढावी व वयोमर्यादा शिथिल करून सर्वसामान्य कुटुंबातील तरुण युवक, युवती विद्यार्थ्यांचा सहानुभूती पूर्वक विचार करावा अशा मागणीचे निवेदन स्थानिक लोकप्रतिनिधी मार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व गृहमंत्री यांना क्रांती स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातील विद्यार्थी, विद्यार्थिनीनी दिले आहे.
या निवेदनावर रोहिदास तांदळे, राजू चव्हाण, अजय व्हावळे, सय्यद रेहान, आकाश शिंदे, मानसी आरबाड, शितल जाधव, अपेक्षा नरवटे, माधव पवार, सुभाष चव्हाण, केशव पन्हाळे, आशा काळे, अश्विनी सलगर, ऐश्वर्या नळदकर, वैष्णवी फुलपगार, राणी पवार, राहुल राठोड, नितीन बोडके, वैष्णवी फड, आरती दुधाटे, प्रणिती पाटील, साक्षी जाधव, नेहा पवार, फारोख पठाण, गजानन चव्हाण, सायली जाधव, रईस पठाण, बंडू राठोड, संघरत्न गायकवाड, अनंत गुळवे , नागेश व्हावळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.