परभणी (Police Bharti) : पोलीस भरती प्रक्रियेत (Police Bharti) मैदानी चाचणीला बुधवार १९ जून पासून सुरुवात झाली. पहिल्या दिवशी ५०० उमेदवारांना बोलावण्यात आले होते. त्यापैकी ३४२ उमेवार भरती प्रक्रियेसाठी उपस्थित होते. यापैकी २८१ उमेदवार मैदानी चाचणीस पात्र ठरले. शारीरिक मोजमाप व कागदपत्र तपासणीत ६१ उमेदवार अपात्र झाले.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील अश्वमेध मैदानावर पहाटे चार वाजल्या पासून (Police Bharti) भरती प्रक्रियेला सुरुवात झाली. बुधवार ५०० उमेदवार बोलावण्यात आले होते. सुरुवातीला उमेदवारांची उंची, छाती मोजण्यात आली. त्यानंतर कागदपत्र पडताळणी झाली. मैदानी चाचणीत शंभर मिटर धावणे, सोळाशे मिटर धावणे आणि गोळाफेक आदी प्रकार घेण्यात आले. भरती प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक पध्दतीने व्हावी यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. (parbhani Police) पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोल आहे. गुरुवार २० जुनच्या मैदानी चाचणीसाठीही ५०० उमेदवारांना बोलावण्यात आले आहे.
500 उमेदवार बोलावण्यात आले होते पैकी 342 उमेदवार हजर झाले. पैकी 281 उमेदवार मैदानी चाचणीस पात्र झाले. शारिरीक मोजमाप व कागदपत्र तपासणीत 61 अपात्र झाले.