चांदूरबाजार (Police Bharti) : महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून पोलीस भरती (Police Bharti) प्रक्रिया तारीख जाहिरात करण्यात आली. मात्र या मध्ये मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांना नुकसान होत असल्याचे दिसून आले आहे. (Police Bharti) पोलिस भरती करणारे विद्यार्थी अनेक वर्षांपासून स्पर्धा परीक्षेमध्ये सराव करीत आहे. या करिता कुठे तरी आपल्या नोकरी करिता आपल्याला संधी मिळणार या करिता दिवस-रात्र मेहनत करून सराव व अभ्यास करत असतो. मात्र काल प्रशासनाच्या माध्यमातून पोलीस भरती तारीख जाहिर करण्यात आली.
त्रस्त परिक्षार्थिंची तहसिल कार्यालयात धडक
या करिता विद्यार्थ्यांचे तीन महिन्यापासून अर्ज भरण्यात आले होते. या मध्ये निवडणूक आल्याने तारीख पुढे ढकलण्यात आली होती. मात्र या सर्व तारीखा वेळेवर काढून या मध्ये विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पोलीस भरती ग्राऊंड तारीख लागोपाठ आल्याने (Chandur Bazar Taluka) चांदुर बाजार तालुका नव्हे तर, पूर्ण महाराष्ट्र भर विद्यार्थी (Police Bharti) पोलीस भरती प्रक्रियेमध्ये लागोपाठ तारीख आल्याने नुकसानीच्या भरपाई मध्ये सापडलेला आहे.
या भरती प्रक्रियेत विद्यार्थ्यांनी अमरावती, पुणे, सातारा, सांगली, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, मुंबई, असे अनेक ठिकाणी फार्म विद्यार्थी यांनी भरले मात्र त्यांना सर्व तारीख ही एका मागे एक आल्याने ४०० ते ५०० किलोमीटर प्रवास कसा करावा असा मोठा प्रश्न पूर्ण जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना पडला आहे. या करिता आज चांदुर बाजार तालुक्यातील स्पर्धा परीक्षेचे ५२ परिक्षार्थी तहसील कार्यालयावर धडकले व तहसीलदार यांना माहिती देऊन परिक्षेच्या तारखा बदलण्याचे निवेदन देण्यात आले. या वेळी मोठ्या संख्येने (Police Bharti) पोलीस भरती तयारी करणारे विद्यार्थी उपस्थित होते. सदर निवेदनातील मागणी न्यायोचीत असल्याचा अभिप्रायासह नायब तहसिलदार प्रथमेश मोहोड यांनी जिल्हाधिकार्यांकडे पाठविला आहे.