वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यातील घटना
हिंगोली (Police Constable) : पोलिसांकडे प्राप्त झालेली तक्रारीचे प्रकरण मिटवून घेण्यासाठी व गुन्हा दाखल न करण्यासाठी ५ हजार रूपयाची लाच मागून स्विकारणार्या वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार संजय गोरे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात चतुभूर्ज केले.
याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मिळालेली माहिती अशी की, (Police Constable) वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यात एका तक्रारदारा विरूद्ध तक्रारीचा अर्ज प्राप्त झाला होता. त्या अर्जाची चौकशी पोलीस हवालदार संजय दत्तात्रय गोरे यांच्याकडे होती. यामध्ये हवालदार गोरे यांनी सदर प्रकरण मिटवून घेण्यासाठी तक्रारदारास फोनवर संपर्क करून ५ हजार रूपयाच्या लाचेची मागणी केली होती. लाच देणे मान्य नसल्याने तक्रारदाराने २३ ऑक्टोंबरला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग हिंगोली येथे रितसर तक्रार दिली होती.
त्या अनुषंगाने शासकीय पंचासमक्ष तक्रारीची पडताळणी केली असता (Police Constable) पोलीस हवालदार गोरे यांनी तक्रारदारास प्रकरण मिटवून घेण्यास व गुन्हा दाखल न करण्यास ५ हजाराच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून ५ डिसेंबरला वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यात सापळा रचला असता दुपारी ३.३० च्या सुमारास लाचेची ५ हजाराची रक्कम स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पोलीस हवालदार संजय गोरे याला रंगेहात पकडले. ही कामगिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधिक्षक संदीप पालवे, अप्पर पोलीस अधिक्षक डॉ.संजय तुंगार, हिंगोलीचे पोलीस उपाधीक्षक विकास घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनायक जाधव, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महंमद युनूस, विजय शुक्ला, तान्हाजी मुंढे, रविंद्र वरणे, ज्ञानेश्वर पंचलिंगे, राजाराम फुफाटे, भगवान मंडलिक, गोविंद शिंदे, गजानन पवार, शेख अकबर, योगिता अवचार, शिवाजी वाघ यांच्या पथकाने केली आहे.
या (Police Constable) प्रकरणात वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार संजय गोरे याच्या विरूद्ध रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती एसीबी पथकाने दिली आहे. वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यात प्राप्त तक्रार मिटवून घेण्यास व गुन्हा दाखल न करण्यास ५ हजाराची लाच स्विकारताना पोलीस हवालदार संजय गोरे याला एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले.
पोलीस उपाधीक्षक घनवट यांच्या नेतृत्वात पाचवी कामगिरी
एसीबीचे पोलीस उपाधीक्षक विकास घनवट हे मागील दोन महिन्यापूर्वी रूजू झाले आहेत. त्यांनी पदभार स्विकारल्यानंतर आतापर्यंत महसूल विभागाचे दोन तलाठी, जीएसटी कार्यालयातील अधिक्षक, शिक्षण विभाग तर आता पोलीस प्रशासनात होणारी लाचखोरी उघड केली आहे. ही त्यांची पाचवी कामगिरी मानली जात आहे. एसीबी पथकामार्फत अनेक वेगवेगळ्या विभागात ही कारवाई करण्यात आली आहे.