आमगांव (Gondia):- अंजोरा येथील शेतकरी भिवा वाढई यांनी पत्रकार परिषद घेउन सांगीतले की 5 मार्च 2024 रोजी स्थानिक पोलीस ठाण्यात दोन बक-या (Goats)चोरी गेल्या म्हणून तक्रार दाखल केली होती, मात्र आज पर्येत पोलिसांनी बकरी चोरांवर कोणतीही कारवाई केलेली नाही. पोलीस बक-या चोरट्यांना आश्रय (shelter) देत आहेत असा आरोप तक्रारदाराने केला आहे.
देवरीच्या बाजारात जाऊन चौकशी केली असता बकऱ्या दिसल्या नाहीत
रिसामा येथील शिव मंदीरात आयोजित पत्रपरिषदेत(press conferences) न्याय मिळावा, अशी मांगणी करताना पीडित शेतकरी भिवा वाढई यांनी बकरी चोरी घटनेची माहिती देताना सांगितले की, सुमारे 5 महिन्यांपूर्वी म्हणजेच 25 जानेवारी 2024 रोजी सायंकाळी 7 वाजता मी व माझे कुटुंबीय घरी परतलो. शेतातून माझ्या शेतात गुरांची गोठा आहे. त्यात मी बक-या बांधल्या होत्या. माझ्या घरी गेल्यानंतर आरोपी दौलत रहांगडाले व भूमराज येळे यांनी दोन शेळ्या चोरून बोलेरो गाडीत भरून विकण्यासाठी नेल्याची माहिती मिळाली असता आमगाव आणि देवरीच्या बाजारात (Market)जाऊन चौकशी केली, पण बकऱ्या दिसल्या नाहीत तर पोलिसांनी 26 जानेवारीला तक्रार दाखल केली.
आरोपीच्या चप्पल व वाहनाच्या खुणा पाहिल्या व सिगारेटचे अर्धवट तुकडे जळले घटनास्थली दिसले
मी पोलिसांना (Police)आरोपींना अटक करण्याची विनंती केली असता, काळजी करू नका, आम्ही तुमच्या बकऱ्यांची किंमत वसूल करून तुम्हाला देऊ, असे आश्वासन देण्यात आले. 5 मार्च रोजी पुन्हा पोलीस ठाण्यात गेलो असता तेथे उपस्थित असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने भूमराजला बोलावले. मी दिवसभर पोलीस ठाण्यात बसून राहिलो, त्यानंतर संध्याकाळी आरोपी आणि त्याचा एक मित्र दोघेही पोलीस ठाण्यात आले. पोलिसांनी त्यांच्याशी चर्चा करून मला ऑनलाइन तक्रार (Complain online)करण्यास सांगितले. दोन्ही आरोपी त्या दिवशी रात्री 11 वाजेपर्यंत पोलिस ठाण्यात होते. त्याच दिवशी रात्री आणखी सहा बक-या चोरीला गेल्या. 6 मार्च रोजी 5 पोलीस तपासासाठी माझ्या शेतात आले असता त्यांनी आरोपीच्या चप्पल व वाहनाच्या खुणा पाहिल्या व सिगारेटचे अर्धवट तुकडे जळले घटनास्थली दिसले , चार महीने झाले तरी बकरी चोरांवर पुलिस कारवाई करीत नसुन आश्रय देता आहेत, पिडित शेतकरी भगवा वाढई म्हणाले की, आता माझा आमगांव पोलीस कारवाई (action)करतील म्हणून विश्वास राहीला नाही? बकरी चोरी प्रकरणाची चौकशी जिला क्राईम ब्रांच मार्फत करावी, अशी मागणी पोलीस अधीक्षक (Superintendent of Police) गोंदिया यांना दिलेल्या पत्राद्वारे केली आहे.