परभणी/पाथरी (Police Poonam Kale) : तालुक्यातील गावातील ऊसतोड मजुराची मुलगी पोलीस खात्याचे प्रशिक्षण पूर्ण करून आल्यानंतर तालुक्यातील वडी येथील ग्रामस्थांनी ढोलताशां लावून तिची मिरवणूक काढत तिचा सत्कार केला. तालूक्यातील वडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षण घेऊन (Police Poonam Kale) पोलीस खात्यात रूजू झालेल्या पुनम राजेभाऊ काळे ही एक ऊसतोड मजुरांची मूलगी असून ती (मुंबई पोलीस) रूजू झाली आहे.
पोलिस खात्याचे नऊ महिन्याचे प्रशिक्षण संपवून गुरुवारी 17 ऑक्टोबर रोजी आपल्या जन्मगावी वडी येथे आली. गांवात तीचे ढोलताशे व डीजे लावून स्वागत करण्यात आले. दोन किलोमीटर अंतरा वरील महादेव नगर येथून तीची मिरवणूक काढून तीचा जिल्हा परिषद शाळेत सत्कार करण्यात आला यावेळी शाळेचे मूख्याध्यापक, सहशिक्षक, सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावकऱ्यांनी केलेल्या भव्यदिव्य स्वागताने भरावलेली पूनम हीला गहीवरून आले होते. (Police Poonam Kale) पूनमने सत्काराला उत्तर देतांना गावातील प्रत्येक मूलीन परिश्रम घेतले की यश हे मिळतच असे सांगितले