परभणीतील गंगाखेड तालुक्यातील घटना!
परभणी (Police Raid) : परभणीच्या गंगाखेड शहरातील परळी रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये सुरु असलेल्या कुंटणखाण्यावर रविवार 27 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास गंगाखेड पोलिसांनी छापा मारत एका 23 वर्षीय पिडितेची सुटका करत वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेसह 4 पुरुषांना ताब्यात घेतले असुन, रविवार रोजी रात्री उशिराने गंगाखेड पोलीस ठाण्यात (Gangakhed Police Station) 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
23 वर्षीय पिडितेची सुटका, एका महिलेसह 4 पुरुष अटकेत!
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, गंगाखेड परळी रस्त्यावरील शिवाजीनगर परिसरात असलेल्या माऊली हॉटेलमध्ये (Mauli Hotel) वेश्याव्यवसाय सुरु असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक श्रीकांत डोंगरे यांनी एक डमी ग्राहक पाठवून हॉटेलमध्ये वेश्या व्यवसाय सुरु असल्याची खात्री करून घेत पोलीस निरीक्षक श्रीकांत डोंगरे यांच्यासह सपोनि दिपाली गित्ते, सपोनि शिवाजी सिंगणवाड, सपोनि आदित्य लोणीकर, पोउपनि राहुल लोखंडे, पोउपनि व्यंकट गंगलवाड, मपोशि स्नेहल जिंकलवाड, पो. शि. दत्तराव चव्हाण, परसराम परचेवाड, सतिशकुमार पांढरे आदींच्या पथकाने रविवार 27 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास हॉटेलवर छापा मारून वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या उर्मिला शिवाजी देवकते रा. कर्लेवाडी ता. गंगाखेड, हॉटेलमधील बालाजी नंदू आडे रा. शिवाजीनगर ता. गंगाखेड यांच्यासह ग्राहक नरसीराम नेथीराम चौधरी रा. दुधवट मेडा जालोर राजस्थान हमु गंगाखेड, कृष्णा सुरेश गयाळ, मंगेश आत्माराम व्हावळे दोघे रा. नाव्हा ता. पालम अशा एकुण 5 जणांना व 23 वर्षीय पिडितेला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. नागापूर ता. परळी हमु. मन्नाथ नगर गंगाखेड येथील रहिवासी 23 वर्षीय पिडितेला उर्मिला देवकते हिने वेश्या व्यवसायात (Prostitute Business) जास्त पैसे मिळतात असे म्हणत पैशाचे आमिष दाखवून तिचे मन परिवर्तन करून वेश्या व्यवसाय करण्यास प्रवृत्त केल्याचा व ग्राहकांकडून मिळणारे पैसे अर्धे अर्धे घेत असल्याचा जवाब पिडीत मुलीने दिल्याने पिडितेची सुटका करत सोमवार 28 जुलै रोजी न्यायाल्यासमोर हजर करण्यात आले. याप्रकरणी पोउपनि राहुल लोखंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या उर्मिला शिवाजी देवकते, बालाजी नंदू आडे यांच्यासह नरसीराम नेथीराम चौधरी, कृष्णा सुरेश गयाळ, मंगेश आत्माराम व्हावळे या ग्राहकांसह वेश्या व्यवसाय करण्यासाठी हॉटेलची जागा उपलब्ध करून देणाऱ्या जागा मालकाविरुद्ध अनैतिक मानव तस्करी प्रतिबंधक अधिनियम 1956 या कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला आहे. याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक श्रीकांत डोंगरे हे करीत आहेत.