परभणी जिल्हा पोलीस शिपाई, चालकपदासाठी १२ हजार २० अर्ज
परभणी (Parbhbani):- जिल्हा पोलीस दलात पोलीस शिपाई, चालक पदासाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. विहित मुदतीत १२ हजार २० अर्ज आले आहेत. प्रत्येकी एका जागेसाठी ८५ उमेदवारांमध्ये स्पर्धा राहणार आहे. परभणी जिल्ह्यात शिपाई आणि चालक पदाच्या एकूण १४१ पदासाठी भरती प्रक्रिया होत आहे.
काहींचे अर्ज शुल्क येणे बाकी असून ते लवकरच प्राप्त होईल
पोलीस दलावरील वाढता ताण लक्षात घेता नवीन उमेदवार भरतीसाठी प्रक्रिया राबविण्यात आली. परभणी जिल्हा पोलीस आस्थापनेवरील शिपाई पदाच्या १११ आणि चालक पदाच्या ३० अशा एकूण १४१ पदासाठी अर्ज मागविण्यात आले होते. उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज केले. विहित मुदतीत १२ हजार २० अर्ज आले आहेत. शिपाई पदाच्या १११ जागांसाठी ६ हजार २२४ आणि चालक पदाच्या ३० जागांसाठी ५ हजार ३६ उमेदवारांचे अर्ज शुल्क प्राप्त झाले आहे. तांत्रिक कारणामुळे काहींचे अर्ज शुल्क येणे बाकी असून ते लवकरच प्राप्त होईल. भरती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचे पोलीस प्रशासनाचे नियोजन आहे. सध्या लोकसभा निवडणूक (Lok Sabha Elections)अचारसंहितेमुळे प्रक्रिया थंडावली आहे. अचार संहितेनंतर गतीने प्रक्रिया पूर्ण होईल, अशी माहिती पोलीस प्रशासनातील(Police Administration) सुत्रांनी दिली आहे.
आचारसंहिते नंतर मैदानी चाचणी
सध्या पोलीस भरती प्रक्रियेची पूर्व तयारी सुरू आहे. आचारसंहिता (code of conduct)संपल्यानंतर पुढील प्रक्रिया होणार आहे. सुरुवातीला मैदानी चाचणी व त्यानंतर लेखी परीक्षा होईल. पोलीस भरतीसाठी उमेदवारांनी एका पदासाठी वेगवेगळ्या घटकात अर्ज सादर केल्याचे निदर्शनास आले आहे. अशा उमेदवारांना सूचना देण्यात आली आले. आपण ज्या पोलीस घटक हद्दित राहत आहात त्या पोलीस अधीक्षक कार्यालयात समक्ष जावून एकाच घटकासाठी एकच आवेदन ग्राह्य धरण्यात यावे व उर्वरित विविध ठिकाणी सादर केलेले अर्ज रद्द करण्याबाबतचे हमी पत्र स्वहस्ताक्षरात भरुन देण्यात यावे. ही कार्यवाही ८ मे ते १७ मे या कालावधीत संबंधित पोलीस अधीक्षक कार्यालयात जावून पूर्ण करावी. विहित मुदतीत कार्यवाही न केल्यास सर्व आवेदन अर्ज बाद करण्यात येतील. या बाबत विशेष पोलीस महानिरीक्षक (Inspector General of Police) प्रविणकुमार पडवळ यांनी ७ मे रोजी प्रसिध्दीपत्र काढले आहे.